Breaking News

प्रसाद लाड यांच्या प्रतिआव्हानाला काँग्रेस प्रवक्ते लोंढेंचे उत्तर, “आम्ही येणार” तुम्हाला काय करायचे ते करा

मराठी ई-बातम्या टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामुळे देशात कोरोना पसरल्याचा आरोप केल्यानंतर काँग्रेसकडून राज्यातील भाजपा नेत्यांच्या घरांसमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्यानंतर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी पटोले यांना सागर बंगल्याच्या जवळ येवून तर दाखव तु परत कसा जातो अशी धमकी ट्विटरवरून व्हिडीओ शेअर करत दिली.

त्यास काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उत्तर देत म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाळीव माफ करा फडणवीस यांच्या बंगल्यावरील वॉचमन कोणी प्रसाद लाड असा खोचक नामोल्लेख करत ते पुढे म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आव्हान दिले आहे. परंतु आम्ही येणार महात्मा गांधी यांच्या अहिंसक मार्गाने आम्ही आंदोलन करणार असून तुम्हाला काय करायचे ते करा असे प्रतिआव्हानही भाजपाला दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या प्रसारासाठी संपूर्ण महाराष्ट्राला जबाबदार धरले असताना महाराष्ट्रातील जे नेते पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर बाके वाजवित होते अशा नेत्यांच्या घरासमोर काँग्रेस आंदोलन करणार असून पंतप्रधान मोदींनी माफी मागे पर्यत हे आंदोलन करत राहणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

तसेच हे आंदोलन आम्ही महात्मा गांधी यांच्या अहिंसक पध्दतीने करणार असल्याचे सांगत तुम्हाला काय करायचे ते करा असे प्रतिआव्हानही त्यांनी यावेळी दिले.

त्यामुळे सोमवारी काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा होण्याची शक्यता दिसत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे.

प्रसाद लाड काय म्हणाले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा व्हिडिओमध्ये एकेरी उल्लेख करत, हिम्मत असेल तर एकटा सागर बंगल्याजवळ ये, नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्ही भाजपावासी नाही. आणि आल्यानंतर तु परत कसा जातो ते बघंच असा सरळ सरळ धमकीवजा आव्हान दिले.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *