Breaking News

छगन भुजबळ म्हणाले, “मध्य प्रदेश सरकारने तर घरातच मद्य ठेवायला…” वाईन्सच्या मुद्यावरून भुजबळांकडून समर्थन

मराठी ई-बातम्या टीम

राज्यात सुप मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर भाजपाकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठविली असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या एका नेत्याने परदेशात वाईन्स विक्रीला परवानगी देण्यासाठी बैठक घेतल्याचा आरोप केला. त्यानंतर तर भाजपाच्या नेत्यांनी टीके धार अधिकच धारदार केल्यानंतर आज सोमयांनी थेट संजय राऊतांनी वायनरी प्रकल्पात भागीदारी केल्याचा आज आरोप केला. यापार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी मध्य प्रदेशात तर घरातच मद्य साठा ठेवण्याची परवानगी दिल्याचे सांगत बार उघडायलाही परवानगी दिल्याचे स्पष्ट केले.

तसेच राज्यात वाईन विक्रीला परवानगी दिली नसती तरी ज्याला पाहिजे तो कोठेही जावून घेईल असे वक्तव्य करत राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले.

वाईन विक्रीचा हा निर्णय वादात सापडला असताना राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री तसेच, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वाईन विक्रीच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. ज्याला घ्यायची आहे, तो कुठेही जाऊन घेणारच.

मध्य प्रदेशात भाजपाचं सरकार आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर मद्य घरात ठेवायला परवानगी दिली आहे. बार उघडायला परवानगी दिली आहे. आख्ख्या जगाने वाईनला हेल्थ फूड म्हणून मंजुरी दिली आहे. त्यात शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल. ज्याला घ्यायची आहे, तो कुठेही जाऊन घेणारच आहे. त्यामुळे उगीच साप साप म्हणून भुई थोपटण्याचं काम आहे. काहीतरी विषय काढून त्याच्यावर आंदोलन करायचं हे काही बरोबर आहे असं मला वाटत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *