Breaking News

महाविकास आघाडीकडून जाहीर पत्राद्वारे केले हे आवाहन सामाईक पत्र लिहून आवाहन

मराठी ई-बातम्या टीम

राज्यात नुकत्यात झालेल्या नगरपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक ठिकाणी विजय मिळविला. त्यानंतर आता नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून सर्वाधिक नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा अध्यक्ष निवडूण आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सहीने एका पत्राद्वारे केले आहे.

राज्याच्या हितासाठी आणि जनतेच्या उत्कर्षासाठी महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली असून त्यास दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. महाविकास आघाडीतील पक्षाकडून किमान समान कार्यक्रमांतर्गत महाविकास आघाडीकडून काम करण्यात येत असल्याची ग्वाही पत्राद्वारे देत महाविकास आघाडीला जनतेने दिलेल्या यशाबद्दल सर्व जनतेचे आभारही या पत्राच्या माध्यमातून मानण्यात आले आहे.

महाविकास आघाडीला मिळालेले यश कायम ठेवायचे असून प्रत्येक नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचाच अध्यक्ष होण्याकरीता सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच समान विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या अध्यक्षाची निवड होणे गरजेचे असल्याचे मतही त्यात व्यक्त करण्यात आले आहे.

या नुकत्यात झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणूकीत एकट्या भाजपाला ४०० हून अधिक जागेवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीला जवळपास ६०० ठिकाणी विजय मिळाला आहे. मात्र नगर पंचायतीच्या अध्यक्ष पदाची निवडणूक लवकरच होणार असून अध्यक्षपद मिळविण्यासाठी भाजपाकडून मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची मते फुटून त्याचा फायदा भाजपाला होण्याची शक्यता गृहीत धरून महाविकास आघाडीकडून हे आवाहन करण्यात आल्याचे राजकिय वर्तुळात बोलले आहे.

फडणवीस सरकारच्या काळात नगराध्यक्ष आणि नगरपंचायतीच्या जागांकरीता स्वतंत्र निवडणूका घेण्याची दुरूस्ती कायद्यात करण्यात आली. तेव्हापासून बहुमत जरी एखाद्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीचे असेल तर नगराध्यक्ष पदी भाजपाचा उमेदवार निवडूण आल्याच्या अनेक घटना राज्यात घडल्या आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ग्रामीण भागातील सत्ताही हातात राखण्याच्या उद्देशाने मोर्चेबांधणी सुरु केल्याचे दिसून येत आहे.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *