Breaking News

राज ठाकरे म्हणाले, तुम्हालाच खुर्चीवर बसवेन पण मी नाही…

मागील काही महिन्यापासून मनसे आणि भाजपा युती करणार असल्याची चर्चा सातत्याने सुरु असून यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकला चलो रे चा नारा देत कार्यकर्त्यांनी पुढचे पाच महिने दिवस रात्र काम केले पाहिजे असे सांगत मी तुम्हाला विजयाकडे घेऊन जाणार असून विधानसभेत, लोकसभेत सत्तेत बसवेन. तसेच त्या खुर्च्यांवर तुम्हालाच बसवेन मात्र मी खुर्चीवर बसणार नाही अशी ग्वाही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिली.
रंगशारदा येथे आयोजित मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील ग्वाही मनसैनिकांना दिली.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुढचे पाच महिने दिवस-रात्र काम केले पाहिजे. तुम्हाला विजयाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी माझी. मी तुम्हाला विधानसभेतही सत्तेत घेऊन जाईन. लोकसभेतही आपले खासदार बसवेन. पण तुम्हालाच खुर्चीवर बसवेन, मी मात्र खुर्चीवर बसणार नाही असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला.

यावेळी त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. येणा-या निवडणूका स्वबळावरच लढण्याचे संकेतही दिले.

या बैठकीत त्यांनी पदाधिका-यांना मार्गदर्शन केले. राज्यातील राजकारण खालच्या थराला गेले आहे. उध्दव ठाकरेंना सहानुभूती मिळतेय असे म्हटले जाते, कसली सहानुभूती यांनी तर जनतेशी प्रतारणा केली आहे. आपल्याला पुढच्या प्रत्येक निवडणुकांत अभूतपूर्व यश मिळवायचे आहे. येत्या दिवाळीत आपल्या चिन्हाचे सगळीकडे कंदील लागले पाहिजेत. नाक्यानाक्यावर पक्षाचे झेंडे लागले पाहिजेत असे आदेशही त्यांनी मनसैनिकांना दिले.

मनसैनिकांनी पुढचे पाच महिने दिवस आणि रात्र काम केले पाहिजे. तुम्हाला विजयाकडे कसे घेउन जायचे याची जबाबदारी माझी. मी तुम्हाला विधानसभेत सत्तेत घेउन जाईन. लोकसभेतही आपले खासदार जातील. मात्र आपल्याकडे सत्ता आली की तुम्हालाच मी खुर्चीत बसवेन मी स्वत बसणार नाही असेही त्यांनी सांगितले असल्याचे समजते.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या ६ व्या टप्प्यात ५९ टक्के मतदान केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली माहिती

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठी आज ५८ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी सहाव्या टप्प्यात मतदान घेतले.  लोकसभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Marathi e-Batmya

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading