Breaking News

मुंबई

वडापावच्या गाडीवर कारवाई; कष्टकऱ्यांची मंत्रालयातील जाळीवर मारली उडी

एकाबाजूला केंद्र आण राज्य सरकारकडून २८ कोटीपैकी २२ कोटी नागरिकांना विविध गरिबीरेखेच्या बाहेर काढले. तसेच विविध माध्यमातून रोजगाराच्या आणि मोफत अन्नधान्य पुरवित त्यांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून सातत्याने करण्यात येत आहे. परंतु मुंबईतील एका कष्टकरी रहिवाशाला आपल्या वडापावच्या गाडीवर कारवाई करत त्याची मोडतोड केल्याने त्याची …

Read More »

शिवभक्ताचा ५०० वेळा पायी रायगड दर्शन, राजू देसाई यांचा सन्मान

शिवचरित्राचे गाढे अभ्यासक, प्रखर शिवभक्त राजेश उर्फ राजू देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘अपरिचित साम्राज्याचा इतिहास’ घराघरात, मनामनात पोहोचविण्याचे भगिरथ कार्य केले आहे, हे कार्य असेच यापुढे सुरु ठेवून शिवरायांचा जाज्वल्य इतिहास सर्वत्र प्रसारित करावा, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांनी राजू देसाई यांचा गौरव केला. …

Read More »

मुंबई पालिका आयुक्त चहल, प बंगालच्या डिजीपींना निवडणूक आयोगाने हटविले

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होऊन दोन दिवस झाले. परंतु निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ज्या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना एकाच पदावर तीन वर्षाहून अधिक काळ झालेले आहेत अशांना निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी इतरत्र बदली करावी असे आदेश दिले होते. परंतु दिल्ली दरबारी असलेले वजन वापरून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय एस …

Read More »

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदी यांचा केवळ मुखवटा…

नरेंद्र मोदींचे कार्यक्रम श्रीमंतासाठी आहेत तर काँग्रेसचे कार्यक्रम गरिब समाजासाठी आहेत. मोदींना प्रचंड अहंकार आहे. २०१४ साली देश स्वतंत्र्य झाला अशी मोदींची धारणा आहे. नेहरू, आंबेडकर यांचे योगदान ते नाकारतात. राहुल गांधी यांनी ज्या शक्तीचा उल्लेख केला ती शक्ती आरएसएसची शक्ती आहे, मनुवादची शक्ती आहे आणि या शक्तीने ते लोकांना …

Read More »

हायजॅक केलेल्या जहाजाची अरबी समुद्रात भारतीय कमांडोंनी केली मुक्तता

डिसेंबर महिन्यात सोमालिया जवळ केलेल्या एका भारतीय मालवाहू पण माल्टा ध्वज लावलेले भारतीय मालकीच्या जहाजाचे समुद्री चाच्यांनी अपहरण केले होते. पण अरबी समुद्रात हे जहाज आले असताभारतीय नौदलाच्या कमांडोनी हे जहाज सोडविले असल्याची माहिती आज पुढे आली. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात दोन दिवसांच्या चाचेगिरीविरोधी मोहिमेनंतर शनिवारी अपहरण केलेल्या जहाजातून १७ …

Read More »

मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप दादरच्या चैत्यभूमीवर

मणिपूरपासून निघालेली राहुल गांधी यांची ऐतिहासिक भारत जोडो न्याय यात्रा ६७०० किलोमीटरचे अंतर पार करून मुंबईतील चैत्यभूमीवर समाप्त झाली. यावेळी राहुल गांधी यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. याआधी सकाळी यात्रा भिवंडीतून सुरु झाली त्यानंतर कळवा, मुंब्रा, ठाणे, भांडूप, सायन, धारावीतून दादर येथील …

Read More »

राज्यात पाच टप्प्यातील निवडणूकीत इतके मतदार करणार मतदान

लोकसभा निवडणूक २०२४ चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे, २०२४ या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आजपासून लागू झाली असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मंत्रालय …

Read More »

संजय राऊत यांचे मोदी आणि आयोगावर सोडले टीकास्त्र

महाराष्ट्रातील राजकारणाचा खेळखंडोबा झाल्यानंतर आणि विद्यमान केंद्रातील भाजपाला २०२४ च्या निवडणूकीत काहीही करून ४०० पार लोकसभा निवडणूकीचा टप्पा पार करायचा असल्याची घोषणा दिली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या माध्यमातून कथित इलेक्टोरल बॉण्डमधून कोणत्या राजकिय पक्षाला किती निधी मिळाला याची गुप्त माहितीही बाहेर आली. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने आज देशातील लोकसभा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, राज्यात दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना बचत गटांशी जोडणार

बचत गटांच्या माध्यमातून होणारे काम हे महिला विकासाबरोबरच तिच्या कुटुंबासाठी देखील महत्त्वाचे ठरत आहे. राज्यात ‘उमेद’ अभियानात ६० लाख तर ‘माविम’च्या माध्यमातून १५ लाख महिला सदस्य असून दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना बचत गटांशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वरळी येथील आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेच्या शुभारंभ …

Read More »

विद्यार्थ्यांसाठी आता आठवड्यातील प्रत्येक शनिवार होणार ‘आनंददायी शनिवार’

विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्यवृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे. …

Read More »