Breaking News

मुंबई

नवी मुंबई मेट्रो उद्या शुक्रवार पासून धावणार, पंतप्रधान मोदी-मुख्यमंत्री शिंदे राहणार गैरहजर

१७ नोव्हेंबर २०२३ पासून नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. १ वरील बेलापूर ते पेणधर दरम्यान मेट्रो सेवा सुरू होत असून नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न साकार होत आहे. मेट्रोच्या रूपाने नवी मुंबईकरांना जलद, पर्यावरणपूरक आणि आरामदायी परिवहनाचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार असून सीबीडी बेलापूरसह वेगाने विकसित होत असलेल्या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, मुंबई, उपनगरांमधील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांच्या… मुंबईतील प्रत्येक भागात स्वच्छतेचे काम मोहिम स्वरुपात करावे

मुंबई शहर व उपनगरातील सर्व रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महापालिका आयुक्तांना दिले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुंबई शहरातील स्वच्छता, प्रदूषण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांबाबत देखील चर्चा झाली. मुख्य सचिव मनोज सौनिक, महापालिका आयुक्त …

Read More »

महादेव अॅप प्रकरणी डाबर कंपनीच्या चेअरमनसह ३२ जणांवर मुंबईत गुन्हे दाखल छत्तीसगडमधील निवडणूकीतील आरोप-प्रत्यारोपांचे पडसादः मुंबई पोलिसांनी केली कारवाई

छत्तीसगड मध्ये सध्या विधानसभा निवडणूकांत काँग्रेस विरूध्द भाजपा असा सामाना दिवाळीतही चांगलाच रंगलेला असताना भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील प्रचार सभेत काँग्रेस मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना महादेव बेटींग अॅपकडून ५०० कोटी रूपये देण्यात आल्याचा आरोप करत तसा व्हिडिओही व्हायरल केला होता. त्यावरून काँग्रेसनेही एक भूपेश बघेल यांचाच एक व्हिडिओ …

Read More »

अरूण गवळी यांचा पॅरोल आणखी चार आठवड्याने वाढविला सर्वोच्च न्यायालयाने याचिवेवरील सुनावणीवेळी दिली मुदतवाढ

मुंबईतील एकेकाळचे अंडरवर्ल्ड डॉन तथा माजी आमदार अरूण गवळी यांच्यावर माजी आमदार कमलाकर जामसांदेकर यांच्यासह ११ जणांच्या हत्येप्रकरणी सध्या तुरुंगाची हवा खात आहे. मात्र अरून गवळी यांना नियमानुसार तुरुंगातून काही काळ सुट्टी अर्थात पॅरोल मंजूर करण्यात आला होता. या पॅरोलची मुदत १८ नोव्हेंबर रोजी संपणार होती. परंतु अरूण गवळी यांनी …

Read More »

दिवाळी निमित्त दादर, परळमधील बाजारपेठा गर्दीने फुल्ल

दिवाळीनिमित्त शनिवारपासून खासगी कार्यालये, कंपन्या तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील आस्थापना यांना सुट्ट्या लागल्याने खऱ्या अर्थाने दिवाळीच्या खरेदी उत्साहाला उधाण आले आहे.त्याचेच प्रतिबिंब शनिवारी दादर, परळसह अन्य मुख्य बाजारपेठांमध्ये दिसून आले. कपडे, फराळ, फटाके, फुले, सजावटीचे सामान इत्यादींच्या खरेदीला प्राधान्य दिले जात होते. आज, रविवारी लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्याने साहित्य खरेदीसाठी मुंबईकर सहकुटुंब …

Read More »

प्रदूषणामुळे मुंबईत झाडाझडती; पीयूसी तपासणीत ८१ वाहने दोषी

मुंबईत होणाऱ्या वायू प्रदूषणासाठी बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ हे प्रमुख कारण आहे. न्यायालयाने सुनावल्यानंतर आरटीओ विभाग अॅक्शन मोडमध्ये आला आहे. मुंबई महानगर क्षेत्रात ९ नोव्हेंबर रोजी केलेल्या ४१७ वाहनांच्या पीयूसी तपासणीत ८१ वाहने दोषी आढळली.मुंबईत मालवाहतूक वाहनांद्वारे बांधकाम साहित्य वाहतूक करताना आवश्यक दक्षता घेण्यात येत नाही. वाहून नेण्यात येत असलेला …

Read More »

मुंब्र्यातील शाखेच्या मालकीवरून उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाने दाखविले काळे झेंडे शिंदे गटाने अखेर मुंब्र्यातील शिवसेना शाखेची जागा बळकाविली

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्रा येथील शिवसेना शाखेच्या इमारतीवर ठाणे महापालिकेने बुलढोझर फिरवित ठाकरे गटाच्या ताब्यातील जागा हिसकावून घेतल्याचे चित्र आज निर्माण झाले. ठाणे महापालिकेच्या कारवाईनंतर ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संबधित शाखेच्या जागेची पाहणी करण्यासाठी मुंब्रा येथे गेले. पण शिंदे समर्थक शिवसैनिकांही उद्धव ठाकरे …

Read More »

मुकेश अंबानी यांनी नीता अंबानींना गिफ्ट केली ‘ही’ महागडी गाडी दिवाळीच्या मुहूर्तावर नीता अंबानी यांच्या टायफात दाखल झाली

मुकेश अंबानी यांच्याकडे जगभरातील सर्व महागड्या गाड्या आहेत अशातच आता मुकेश अंबानींनी देशातील सर्वात महागडी एसयुव्ही खरेदी केली आहे. ही एसयुव्ही त्यांनी पत्नी नीता अंबानी यांना गिफ्ट केली आहे. नुकतीच ही एसयुव्ही झेड प्लस सुरक्षेच्या गराड्यात मुंबईच्या रस्त्यांवर दिसली आहे. रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज असे या एसयुव्हीचे नाव आहे. …

Read More »

नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारतीची किंमत ठरली, लवकरच ताब्यात एअर इंडिया बुडीत उत्पन्न व दंड माफ

नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले उचलण्यात येत असून एअर इंडियाचे सर्व बुडीत उत्पन्न व अन्य दंड माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची ही इमारत मोक्याच्या ठिकाणी असून येथून विलोभनीय देखावा दिसतो. …

Read More »

मुंबईच्या सीएसएमटी World Heritage Building चा आज वाढदिवसः ४२५ विशेष ट्रेन

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील प्रसिध्द अशा सीएसएमटीच्या इमारतीला पाहिल्यानंतर अनेकांना या इमारतीचे आश्चर्य वाटते. या इमारतीची भव्य अशी कलाकुसर, प्रत्येक ठिकाणी इमारतीची वैशिष्टेपूर्ण दगडी बांधकांमामुळे या इमारतीला भारतासह जगभरातील अनेक पर्यटक आवर्जून पहायला येतात. या इमारतीला आज ७२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मध्य रेल्वेने इमारतीला विद्युत रोषणाई केली. या विद्युत …

Read More »