Breaking News

प्रदूषणामुळे मुंबईत झाडाझडती; पीयूसी तपासणीत ८१ वाहने दोषी

मुंबईत होणाऱ्या वायू प्रदूषणासाठी बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ हे प्रमुख कारण आहे. न्यायालयाने सुनावल्यानंतर आरटीओ विभाग अॅक्शन मोडमध्ये आला आहे. मुंबई महानगर क्षेत्रात ९ नोव्हेंबर रोजी केलेल्या ४१७ वाहनांच्या पीयूसी तपासणीत ८१ वाहने दोषी आढळली.मुंबईत मालवाहतूक वाहनांद्वारे बांधकाम साहित्य वाहतूक करताना आवश्यक दक्षता घेण्यात येत नाही. वाहून नेण्यात येत असलेला माल आच्छादित करण्यात येत नाही, असे आढळले आहे.

भारक्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक तसेच बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या मालाची खडी, सिमेंट वीट, डबर, वाळू इत्यादी वाहतूक तसेच ट्रान्झिट मिक्सरद्वारे वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांविरोधात मोहीम राबविण्याचे आदेश अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी आरटीओ कार्यालायांना दिले होते याच पार्श्वभूमीवर राज्यात १९८६ वाहनांची तपासणी केली. यामध्ये ३०५ वाहने दोषी आढळली. त्यांच्याकडून ५. ७६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

वायू प्रदूषणाबाबत न्यायालयाने सुनावल्यानंतर परिवहन विभाग आणखी कारवाई वाढवत पीयूसी कारवाईबाबत विशेष मोहीम सुरु केली. राज्यातील २६५२ पैकी २६६ पीयूसी केंद्रांची तपासणी करण्यात आली; पण त्यामध्ये एकही दोषी आढळले नाही. या प्रकरणात १ लाख १० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, हेमंत करकरे यांची हत्या कसाबने नव्हे तर आरएसएसच्या…

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) माजी प्रमुख हेमंत करकरे यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *