Breaking News

एलआयसीचा तिमाही निकाल जाहिर, नफ्यात ५० टक्के घट इतक्या कोटी रूपयांचा झाला नफा

सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी एलआयसी (LIC) ने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कालावधीत कंपनीच्या नफ्यात ५० टक्क्यांनी घट झाली आहे. सप्टेंबर तिमाहीत एलआयसीचा नफा ७,९२५ कोटी रुपये राहिला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत नफा १५,९५२ कोटी रुपये होता.

शेअर बाजाराकडे दाखल केलेल्या नियामक फाइलिंगमध्ये एलआयसीने सांगितले की, जुलै-सप्टेंबर तिमाहीत निव्वळ प्रीमियम उत्पन्न १,०७,३९७ कोटी रुपये होते, जे गेल्या आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीत १,३२,६३१.७२ कोटी रुपये होते. एलआयसीच्या उत्पन्नातही घट झाली आहे. कंपनीचे उत्पन्न २,०१,५८७ कोटी रुपये आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत उत्पन्न २,२२,२१५ कोटी रुपये होते.

एलआयसीचा एकूण एनपीए २.४३ टक्के आहे. जो मागील वर्षी याच तिमाहीत एनपीए ५.६० टक्के होता. मात्र, निव्वळ एनपीएमध्ये कोणताही बदल झालेला नाही. एलआयसीच्या गुंतवणुकीचे उत्पन्न वाढून ९३,९४२ कोटी रुपये झाले आहे. हा आकडा मागील वर्षी ८४,१०३ कोटी रुपये होता.

एलआयसीने मे २०२२ मध्ये सर्वात मोठा आयपीओ आणला होता. कंपनीने ९४९ रुपये प्रति शेअर या भावाने बाजारातून पैसे उभे केले होते. परंतु शुक्रवार, १० नोव्हेंबर २०२३ रोजी बाजार बंद झाल्यावर ९४९ रुपयांची किंमत असलेले शेअर्स ६१० रुपयांवर बंद झाले. याचा अर्थ गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर ३६ टक्के किंवा प्रति शेअर ३३९ रुपये तोटा सहन करावा लागत आहे. एलआयसीचे बाजार भांडवल ३.८६ लाख कोटी रुपयांवर आले आहे. आयपीओ आणला तेव्हा एलआयसीचे बाजार भांडवल ६ लाख कोटी रुपये होती. म्हणजेच एलआयसीच्या बाजार भांडवलात २.१४ लाख कोटी रुपयांहून अधिक घट झाली आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

देशातील ३ सरकारी बँकांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एफडीवर व्याज वाढवले असे आहेत व्याजदर

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांनी अलीकडेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *