Breaking News

आता बिअर बार आणि रेस्टॉरंट सुरु केल्यानंतर हे नियम पाळावे लागणार पर्यटन विभागाकडून नियमावली जारी

मुंबई : प्रतिनिधी

Missionbeginagain अंतर्गत अनलॉक-५ नुसार राज्यातील रेस्टॉरंट ५ ऑक्टोंबरपासून सुरु करण्यास राज्य सरकारने नुकतीच परवानगी देत यासंदर्भातील नियमावली जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार रेस्टॉरंट सुरु करण्यासंदर्भातील नियमावली राज्याच्या पर्यटन विभागाकडून आज जारी करण्यात आली. जाहीर करण्यात आलेली नियमावली खालील प्रमाणे..

  • बिअर बार, फुड कोर्ट, रेस्टॉरंट आदी गोष्टी या ५० टक्के क्षमतेने सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली.
  • प्रत्येक येणाऱ्या ग्राहकाची स्क्रिन टेस्ट अर्थात त्याच्या शरीराचे तापमानाची तपासणी करावी.
  • कोरोनाची लक्षणे नसलेल्यांनाच आतमध्ये प्रवेश द्यावा.
  • ज्यांच्या शरीराचे तापमान ३८.० पेक्षा जास्त असणाऱ्या आणि फ्लुची लक्षणे असलेल्यांना प्रवेश देवू नये. तसेच प्रत्येक येणाऱ्या ग्राहकाचा संपर्क नंबरची नोंद ठेवावी. जर असे कोणी लक्षणे असलेला व्यक्ती आला तर त्याला परत जाण्याचा सल्ला द्यावा.
  • सेवा पुरविण्या अगोदर शाररीक अंतर पाळावे
  • ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग आणि प्रशासनाशी शेअर करण्यात येणार असल्याची आधी मान्यता घ्यावी. जेणेकरून कॉन्टक्ट ट्रेसिंगसाठी त्यांने दिलेली माहिती उपयोगी येवू शकेल.
  • ग्राहकांना आत प्रवेश देताना सदर व्यक्तीने चेहऱ्यावर मास्क परिधान केलेला असणे बंधनकारक आहे. तसेच त्या आवारात असेपर्यत त्याने मास्क परिधान करणे बंधनकारक आहे.
  • ग्राहकांसाठी हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध करून देणे सदर यंत्रणेला बंधनकारक आहे.
  • शक्यतो ग्राहकांना डिजीटल पेमेंट करण्यास उद्योकत करावे. तसेच या सर्व गोष्टी करताना त्यांने जास्तीत जास्त काळजी यासाठी उद्युक्त करावे.
  • वॉशरूम, हात धुण्याची जागा सतत स्वच्छ कारावी तसेच त्याचे सॅनिटायझ करावे.
  • कॅश काऊंटर आणि ग्राहकांचा संपर्क टाळायचा असेल तर काऊंटरवर शक्यतो दोघांच्या मध्ये काचेचा ग्लास बसवावा.
  • डिलीव्हरी ड्रायव्हर, आणि इतर कॉन्ट्रक्टर भेट देत असतील त्यांच्यासोबतचे संपर्क-संभाषण कर्मचाऱ्यांशी कमीत कमी ठेवावा. तसेच त्यांच्याकडून कोणतीही वस्तू किंवा माल मिळाल्यानंतर त्याची पोचपावती डिजीटल स्वरूपात द्यावी.
  • शक्यतो एसी वापरण्याऐवजी मोकळी हवा त्या प्रिमायसीस मध्ये खेळती रहावी या उद्देशाने व्यवस्था करावी.
  • सीसीटीव्ही सारख्या गोष्टी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवावी.
  • पुरेशी मोकळी जागा असेल तर स्टाफला मास्क आणि हॅण्ड ग्लोव्हस घालण्यास बंधनकारक करावे.
  • कॉन्टॅक्टलेस मेनू क्यू आऱ् कोडचा वापर करून उपलब्ध करून द्यावा.
  • कापडी नॅपकीनचा वापर करण्याऐवजी चांगल्या दर्जाचे डिसपोजल नॅपकिन वापरावेत.
  • ग्राहकांना शक्यतो डिजीटल पेमेंट देण्यासाठी प्रोत्साहीत करावे.
  • बाटलीतील किंवा फिल्टर असलेले पाणी ग्राहकांना द्यावे.
  • ग्राहकांसाठी फक्त शिजवलेले अन्नच द्यावे तसेच थंड असलेले आणि फ्रिज मध्ये ठेवलेल्या अन्न मेनूमध्ये आणि ग्राहकांना देवू नये.
  • ग्राहकांसाठी असलेला भाग ग्राहक येण्यापूर्वी आणि गेल्यानंतर सॅनिटायझ करावा. त्याचबरोबर तेथील टेबल, खुर्ची, कामाचे ठिकाण, बफेट टेबल आधी गोष्टी स्वच्छ आणि सॅनिटायझ करावेत.
  • बफेट सर्व्हिसला परवानगी नाही.
  • मनोरंजन आतमध्ये सुरु ठेवण्यास बंदी.
  • ग्राहकांची घेतलेली माहिती प्रशासनाला उपलब्ध करून द्यावी. तसेच त्याचे रेकॉर्ड ३० दिवसापर्यत उपयोगात येवू शकते. त्याअनुषंगाने ती माहिती जपून ठेवावी.
  • एसओपीमधील अन्य काही सूचना 

                कोरोनाच्या लक्षणासंदर्भात सर्व ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करण्यात यावी. लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा. सेवा देताना किंवा प्रतिक्षा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. ग्राहकांनी मास्क परिधान केलेला असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा. खानपानाशिवाय इतर वेळी ग्राहकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग किंवा प्रशासनास देण्याबाबत त्यांची नाहरकत घेण्यात यावी. संबंधीत आस्थापना चालकांनी ग्राहकांसाठी हँड सॅनिटायजर उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. परिसरातील महत्वाच्या ठिकाणी ते उपलब्ध करण्यात यावेत. डिजीटल माध्यमाद्वारे चलन देण्यास प्रोत्साहन द्यावे. रोख चलनव्यवहार असल्यास चलनाची हाताळणी काळजीपूर्वक करावी. रेस्टरुम आणि हात धुण्याच्या जागांची (वॉशरुम) वेळोवेळी स्वच्छता (सॅनिटाईज) करण्यात यावी. काऊंटरवर कॅशिअर आणि ग्राहकांमध्ये शक्यतो प्लेक्सिग्लास स्क्रीन असावे. शक्य असल्यास प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवावेत. शक्य असल्यास दारे – खिडक्या खुल्या ठेवून शुद्ध हवा आत येऊ द्यावीएसीचा वापर टाळावा. एसी वापरणे अनिवार्य असल्यास त्या यंत्रणेचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असाव्या. क्युआर कोडसारख्या माध्यमातून संपर्करहीत मेनुकार्ड उपलब्ध करावे. कापडाच्या नॅपकिनऐवजी चांगल्या दर्जाच्या विघटनशील पेपर नॅपकिनचा वापर करावा. टेबलांच्यामध्ये किमान 1 मीटर अंतर राहील याप्रमाणे रेस्टॉरंटबार यांच्या रचनेमध्ये आवश्यक बदल करण्यात यावा. ग्राहकाच्या मागणीनुसार बाह्यबाजू निर्जंतुक केलेली पाण्याची बाटली किंवा फिल्टर केलेले पाणी उपलब्ध करावे. मेनुमध्ये शक्यतो शिजवलेल्या पदार्थांचा समावेश असावा. शक्य असल्यास सलाडसारखे कच्चे पदार्थथंड पदार्थ टाळावेत. प्रत्येक ग्राहकाच्या वापरानंतर त्या जागेचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. टेबलखुर्च्याकाऊंटर आदी जागांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे. बुफे सेवेला परवानगी नसेल. जिथे शक्य असेल तिथे मेनुमध्ये प्री – प्लेटेड डिशेसना प्रोत्साहन देण्यात यावे. प्लेटस्चमचे आदी सर्व भांडी गरम पाण्यात आणि संमत असलेल्या मान्यताप्राप्त डिसइन्फेक्टंटनी (जंतुनाशक) धुवावीत. सेवा देण्याच्या वस्तुभांडी ही वेगवेगळी आणि सॅनिटाईज केलेल्या कपबोर्डमध्ये ठेवावीत. भांडी आणि अन्नपदार्थ गरम ठेवण्यासाठी वेगवेगळे वॉर्मर्स वापरावेत. ग्राहकांनी वापरलेली भांडी एका बाजुला जमा न करता ती तातडीने धुण्यासाठी न्यावीत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने ग्राहकाचे नावसंपर्क क्रमांकईमेल आदी माहिती घेण्यात यावी. करमणुकीच्या लाईव्ह कार्यक्रमास मनाई असेल. तसेच बिलीयर्डसडार्टस्व्हीडीओ गेम्स आदी गेम क्षेत्रास मनाई असेल. इनडोअर आणि आऊटडोअर कार्ड रुमला मनाई असेल. सर्व आस्थापनांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची नियमीत कोव्हीड चाचणी करणे अत्यावश्यक आहे. एन 95 किंवा याच दर्जाचा मास्क कर्मचारी वापरतील याची खात्री करावी. परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी दिवसातून दोनवेळा परिसर सॅनिटाईज करावा. सीसीटीव्ही रेकॉर्ड जतन करण्यात यावे.

                ग्राहकांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो जागेचे पूर्व आरक्षण करावे. आस्थापना चालकांनी सेवा देताना कोरोना रोखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतांबाबत तसेच वैयक्तिक स्वच्छतासोशल डिस्टन्सिंग आदीबाबत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे. याशिवाय ग्राहकांनी रेस्‍टॉरंटमध्ये येण्यापुर्वी आणि आल्यानंतर घ्यावयाच्या दक्षताअन्न आणि पेयपदार्थ तयार करणे आणि त्याची सेवा देताना घ्यावयाच्या दक्षताकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांना द्यावयाचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षणग्राहकांना सेवा देताना घ्यावयाची दक्षताबारमध्ये घ्यावयाच्या दक्षताकिचनमध्ये घ्यावयाच्या दक्षतासुक्या आणि ओल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापनस्टाफ एरियासंदर्भातील मार्गदर्शक तत्वेकर्मचाऱ्यांची वाहतूककर्मचाऱ्यांच्या गणवेशासंदर्भातील मार्गदर्शक तत्वेकर्मचाऱ्यांची खानपान सुविधाएखाद्या कर्मचाऱ्यामध्ये कोरोना लक्षणे आढळल्यास किंवा कोरोनाबाधीत आढळल्यास तातडीने करावयाची कार्यवाही अशा विविध मुद्द्यांसंदर्भातील मार्गदर्शक सुचनांचा समावेश एसओपीमध्ये करण्यात आला आहे.

                आस्थापनांसमवेत झालेल्या चर्चाकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयडब्ल्यूएचओयुएनडब्ल्यूटीओकेंद्रीय पर्यटन मंत्रालय यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच एफएसएसएआय यांनी कोरोनाकाळात अन्नसुरक्षेबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे ही एसओपी तयार करण्यात आली आहे.  

Check Also

सा.बां.विभागाच्या रस्त्यांवर चालणाऱ्या या वाहनांच्या टोलमध्ये वाढ हलक्या वाहनांवरील सूट कायमच-मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खासगीकरण प्रकल्पांवर केवळ जड वाहनांसाठी पथकर दरामध्ये काही प्रमाणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *