Breaking News

एकूण संख्या ६० हजाराच्या तर अॅक्टीव रूग्णांची ४० हजाराच्या काटावर राज्यात २५०० वर नवे रूग्ण,तर मृतकांची संख्या १९८२ वर

मुंबई: प्रतिनिधी
आज ८५ जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतकांची संख्या २ हजार संख्येच्या अगदी काटावर येवून ठेपली असून ही संख्या १९८२ वर पोहोचली आहे. तर आज २५९८ नव्या रूग्णांचे निदान झाल्याने एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५९ हजार ५४६ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३९ हजार ९३९ वर पोहोचली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
तसेच आज ६९८ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने आतापर्यंत घरी जाणाऱ्यांची संख्या १८ हजार ६१६ वर पोहोचली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ३१.२६ % एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर – ३.३२ % आहे. तर सध्या राज्यात ६,१२,७४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५,१२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६० पुरुष तर २५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ८५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४५ रुग्ण आहेत तर ३१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ९ जण ४० वर्षांखालील आहे. या ८५ रुग्णांपैकी ४५ जणांमध्ये ( ५३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १९८२ झाल्याचे त्यांनी सांगितले.
आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १५ मे ते २५ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ४८ मृत्यूंपैकी मुंबई २२, सोलापूर -५ , अकोला ४, औरंगाबाद ३, सातारा -३, ठाणे -३, वसई विरार -३, जळगाव -१, नांदेड -१, नवी मुंबई -१, पुणे -१ आणि रायगड येथील १ मृत्यू आहे.
प्रयोगशाळा तपासण्या –आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४,१९,४१७ नमुन्यांपैकी ५९,५४६ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट २८१६ झोन क्रियाशील असून आज एकूण १७,२११ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६५.६१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई महानगरपालिका ३५४८५ ८६५० ११३५ २५६९४
ठाणे ८२२० २३०० १५५ ५७६५
पालघर ८२५ २७३ २३ ५२९
रायगड ९४४ ४८८ २६ ४२८
नाशिक १०४३ ७५५ ५२ २३६
अहमदनगर ९२ ४८ ३८
धुळे १२९ ६७ ५३
जळगाव ५२६ २३९ ५२ २३५
अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
नंदूरबार ३२ २०
१० पुणे ६८९६ ३२४२ ३०१ ३३५३
११ सोलापूर ७११ ३०३ ५९ ३४९
१२ सातारा ४२९ १२८ १६ २८५
१३ कोल्हापूर ३५१ ३६ ३१४
१४ सांगली १०१ ४६ ५४
१५ सिंधुदुर्ग १९ १२
१६ रत्नागिरी २०४ ७६ १२३
१७ औरंगाबाद १३७० ८७९ ६० ४३१
१८ जालना ८७ २४ ६३
१९ हिंगोली १४३ ९२ ५१
२० परभणी ४० ३८
२१ लातूर १०७ ५० ५४
२२ उस्मानाबाद ५४ १२ ४२
२३ बीड ४१ ३८
२४ नांदेड १०८ ६९ ३३
२५ अकोला ५२९ २५० २८ २५०
२६ अमरावती १९७ ९० १४ ९३
२७ यवतमाळ ११६ ९२ २४
२८ बुलढाणा ५५ २८ २४
२९ वाशिम
३० नागपूर ४९५ ३३६ १५०
३१ वर्धा ११ १०
३२ भंडारा २० १९
३३ गोंदिया ५१ ५०
३४ चंद्रपूर २५ २०
३५ गडचिरोली २८ २८
  इतर राज्ये /देश ५४ १३ ४१
  एकूण ५९५४६ १८६१६ १९८२ ३८९३९

( टीपआय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २८८ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील ११९ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे रुग्ण डिस्चार्ज माहिती आज दुपारी ३ वाजेपर्यंतची आहे.) 

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे ४९ मुंबई -३८, वसई विरार-४, ठाणे – ४, नवी मुंबई -२, रायगड – १
नाशिक जळगाव -१
पुणे २६ पुणे मनपा -१०, सातारा -९, सोलापूर मनपा -७
औरंगाबाद औरंगाबाद -३
लातूर नांदेड मनपा -१
अकोला अकोला मनपा – ५

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *