Breaking News

२४ तासात आतापर्यतची सर्वाधिक मृत्यूची नोंद ९७ जणांचे मृत्यू तर २०९१ नव्या रूग्णांचे निदान

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात मागील काही दिवसांमध्ये कोरोनाबाधीतांच्या मृत्यूमध्ये आकडे कमी-जास्त होताना दिसून येत होते. तसेच मागील काही दिवसात ही संख्या कधी ८४ तर कधी ६० च्या दरम्यान रहात असे. मात्र आतापर्यत सर्वाधिक ९७ जणांचा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून २ हजार ९१ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे कोरोनाबाधीतांची संख्या ५४ हजार ७५८ वर पोहोचली तर ३६ हजार ४ अॅक्टीव्ह रूग्ण झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
तसेच आज ११६८ जण आजारातून बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले असून घरी जाणाऱ्यांची संख्या १६ हजार ९५४ इतकी झाली आहे.
राज्यात ९७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३९, ठाण्यात १५, कल्याण डोंबिवलीमध्ये १०, पुण्यात ८ , सोलापूरात ७, औरंगाबाद मध्ये ५, मीरा भाईंदरमध्ये ५, मालेगाव मध्ये ३ आणि उल्हासनगर मध्ये ३, तर नागपूर शहर १ आणि रत्नागिरीमध्ये १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६३ पुरुष तर ३४ महिला आहेत. आज झालेल्या ६० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३७ रुग्ण आहेत तर ४९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. या ९७ रुग्णांपैकी ६५ जणांमध्ये ( ६७ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १७९२ झाली आहे.
आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३५ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १७ एप्रिल ते २३ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ६२ मृत्यूंपैकी मुंबईचे १९, ठाण्याचे १५, कल्याण डोंबिवलीचे ९, सोलापूरचे ६, मीरा भाईंदरचे ५, उल्हासनगरचे ३ आणि मालेगावचे ३ तर पुण्यातील १ आणि औरंगाबाद मधील १ मृत्यू आहे.
प्रयोगशाळा तपासण्या – आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३,९०,१७० नमुन्यांपैकी ५४,७५८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या २५६२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १६,७८० सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६५.९१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
इतर महत्वाचे मुद्दे – सध्या राज्यात ५,६७,६२२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५,२०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *