Breaking News

कोरोना : अकोला, अमरावती वाढ कायम तर राज्यात बाधित-मृतकांमध्ये घट ५ हजार २१० नवे बाधित, तर ५ हजार ३५ बरे झाले तरी १८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात काल ७ हजाराच्या घरात रूग्ण आढळून आल्यानंतर आज तब्बल ३ हजार रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर विदर्भातील अकोला आणि अमरावती मंडळात आणि पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये मात्र कोरोना बाधितांच्या संख्येत वाढच नोंदविण्यात आली आहे. अकोल्यात २०० हून अधिक, तर अमरावतीमध्ये ६०० हून अधिक तर बुलढाण्यात १०० हून अधिक तर नागपूरातही ७ हून अधिक रूग्ण आढळून आले आहेत. पुणे –पिंपरी चिंचवडमध्ये ७०० च्या जवळपास बोधित रूग्ण आढळून आले आहेत. तर नाशिकमध्ये कालच्या तुलनेत आज बाधित कमी आढळून आले. मुंबईत मात्र कालच्या तुलनेत २०० रूग्ण कमी नोंदविण्यात आले आहे.

मागील २४ तासात ५,०३५ रुग्ण बरे झाल्याने राज्यात आजपर्यंत १९ लाख ९९ हजार ९८२ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९६% एवढे झाले आहे. तर आज राज्यात ५,२१०  नवीन रुग्णांचे निदान झाल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५३ हजार ११३ इतकी नोंदविण्यात आली आहे. तर आतापर्यतचे सर्वात कमी अर्थात १८ मृतकांची नोंद राज्यात झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.४६ % एवढा असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५७,९३,४२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,०६,०९४ (१३.३४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२४,०५४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,८९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७६१ ३१९८८९ ११४४६
ठाणे ६३ ४२३३२ ९९५
ठाणे मनपा १३२ ६१७३० १२५३
नवी मुंबई मनपा १०८ ५९०२१ ११२२
कल्याण डोंबवली मनपा १३४ ६६१३५ १०५०
उल्हासनगर मनपा ११ ११८१७ ३५१
भिवंडी निजामपूर मनपा ६९१७ ३४१
मीरा भाईंदर मनपा २७ २८४५२ ६६७
पालघर १५ १७१४३ ३२१
१० वसईविरार मनपा २२ ३१५०७ ६१८
११ रायगड ३४ ३८०९७ ९९१
१२ पनवेल मनपा ५३ ३२००९ ६०२
ठाणे मंडळ एकूण १३६४ ७१५०४९ १९७५७
१३ नाशिक ५४ ३८२५८ ८००
१४ नाशिक मनपा १२७ ८२४४४ १०७३
१५ मालेगाव मनपा १२ ४९२३ १६४
१६ अहमदनगर ८१ ४७६४७ ७१७
१७ अहमदनगर मनपा ३९ २६४६८ ४०४
१८ धुळे ८८७८ १८७
१९ धुळे मनपा ३३ ७६९१ १५०
२० जळगाव ७० ४५३८० ११६५
२१ जळगाव मनपा ६५ १३७२५ ३३०
२२ नंदूरबार १०१२१ २१८
नाशिक मंडळ एकूण ४९२ २८५५३५ ५२०८
२३ पुणे १४५ ९६२६२ २१४५
२४ पुणे मनपा ३३६ २०४७५८ ४५६४
२५ पिंपरी चिंचवड मनपा २०७ १०००९४ १३२६
२६ सोलापूर ३७ ४३८६९ १२१५
२७ सोलापूर मनपा २९ १३४७९ ६२२
२८ सातारा ९० ५८०१० १८३७
पुणे मंडळ एकूण ८४४ ५१६४७२ ११७०९
२९ कोल्हापूर ३४७५६ १२५७
३० कोल्हापूर मनपा १४७१८ ४१७
३१ सांगली ३३१२१ ११६१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८०७५ ६२९
३३ सिंधुदुर्ग ६५७४ १७७
३४ रत्नागिरी ११९७५ ४१३
कोल्हापूर मंडळ एकूण २७ ११९२१९ ४०५४
३५ औरंगाबाद २० १५८१४ ३२९
३६ औरंगाबाद मनपा १९४ ३५२७४ ९२७
३७ जालना २३ १४०७४ ३७०
३८ हिंगोली १८ ४५८१ १००
३९ परभणी ४५७८ १६५
४० परभणी मनपा १५ ३६७१ १३२
औरंगाबाद मंडळ एकूण २७५ ७७९९२ २०२३
४१ लातूर २१८२७ ४७३
४२ लातूर मनपा २८ ३३८१ २३०
४३ उस्मानाबाद १७८६२ ५६०
४४ बीड ३९ १८८०६ ५६०
४५ नांदेड ९१२६ ३८६
४६ नांदेड मनपा २१ १३७९० २९५
लातूर मंडळ एकूण १०८ ८४७९२ २५०४
४७ अकोला ५९ ५२०२ १३७
४८ अकोला मनपा १६७ ८९२० २३८
४९ अमरावती ९४ १०२०४ १८८
५० अमरावती मनपा ५५५ २१०५५ २५२
५१ यवतमाळ ९४ १७२२२ ४७२
५२ बुलढाणा १३५ १६७४७ २५४
५३ वाशिम ५० ८०१९ १६१
अकोला मंडळ एकूण ११५४ ८७३६९ १० १७०२
५४ नागपूर १३० १७२५८ ७७७
५५ नागपूर मनपा ६४३ १२८३२८ २६८७
५६ वर्धा ९० १२१५८ ३०४
५७ भंडारा १९ १३८०३ ३१३
५८ गोंदिया १४ १४४९४ १७३
५९ चंद्रपूर २१ १५२२७ २४७
६० चंद्रपूर मनपा १४ ९३०३ १६४
६१ गडचिरोली १५ ८९४९ ९९
नागपूर एकूण ९४६ २१९५२० ४७६४
इतर राज्ये /देश १४६ ८५
एकूण ५२१० २१०६०९४ १८ ५१८०६

आज नोंद झालेल्या एकूण १८ मृत्यूंपैकी ६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३ मृत्यू नाशिक-२ आणि लातूर-१ असे आहेत.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *