Breaking News

अर्थविषयक

रतन टाटा, आदर पुनावाला यांच्यासह चौघांना राज्याचा उद्योगरत्न पुरस्कार पहिल्या महाराष्ट्र उद्योग पुरस्कारांचा २० ऑगस्टला प्रदान सोहळा

महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर यावर्षीपासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीचे उद्योग पुरस्कार जाहीर झाले असून पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांना तर उद्योगमित्र पुरस्कार आदर पुनावाला यांना तसेच उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना, …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, उदंचन जलविद्युत प्रकल्प भविष्यात अधिक उपयुक्त ठरणार २८०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती, १२ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक, ६ हजार रोजगार निर्मिती

अक्षय ऊर्जेमध्ये राज्य वेगाने पुढे जात आहे. अशा परिस्थितीत राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी राज्य शासन आणि मे.नॅशनल टाटा पॉवर कंपनी यांच्यातील सामंजस्य करार अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. भविष्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प अधिक महत्वाचे आणि उपयोगी ठरणार आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी …

Read More »

जुलै २०२३ मध्ये जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल अर्थ मंत्रालयाकडून संकलनाचे आकडे जाहीर

माहे जुलै २०२३ मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यांमध्ये अव्वल ठरले आहे. देशात जुलै २०२३ मध्ये जीएसटी संकलन १,६५,१०५ कोटी रुपये झाले असून, राज्यात २६ हजार ६४ कोटी रुपये कर महसूल संकलित झाला आहे , जे मागील वर्षाच्या तुलनेत १८ टक्क्यांनी वाढले आहे. अर्थ मंत्रालयाकडून जीएसटी संकलनाबाबत जाहीर …

Read More »

व्यावसायिक गॅस झाला १०० रूपयाने स्वस्त जेवण आणि नास्ता स्वस्त होण्याची शक्यता

सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि वायू विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ९९.७५ रुपयांनी कमी केली आहे. आजपासून नवे दर लागू होणार आहेत. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आता दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर १६८० रुपयांना मिळेल, जो पूर्वी १७८० रुपयांना मिळत होता. कोलकातामध्ये, हे १८०२.५० रुपयांना उपलब्ध होईल, जे आधी १८९५.५० …

Read More »

हजारो कोटींच्या मागण्या असतात का?… अजित पवार यांनीही मांडल्या ४१ हजार कोटींच्या सप्लीमेंटरी डिमांड नमो शेतकरी योजनेसाठी चार हजार कोटी, ग्रामीण भागातील सुविधांसाठी दीड हजार कोटी

भाजपा प्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या सुरुवातीला जवळपास ४० हजार कोटी रूपयांहून अधिकच्या मागण्या सादर केल्या. त्यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हजारो कोटी रूपयांच्या मागण्या असतात का? असा सवाल उपस्थित करत आर्थिक नियोजन नीट करता येत नसल्याचा आरोप केला. त्यास फक्त चारच …

Read More »

हरित हायड्रोजन धोरण जाहीर, ८ हजार ५०० कोटीस मान्यता राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती

नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजनच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. असे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ८ हजार ५६२ कोटी रुपये खर्चास देखील मान्यता देण्यात आली. पंतप्रधानांनी राष्ट्रीय …

Read More »

सर्वसामान्यांसाठी खुषखबरः या इलेक्ट्रॉनिक वस्तु होणार स्वस्त…या कारणामुळे छोटो टी.व्ही, मोबाईल फोनसह अनेक वस्तुंवरील जीएसटी झाला कमी

इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील भरमसाठ जीएसटीमुळे वॉशिंग मशिन, टीव्ही, फोनसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी महाग झाल्या होत्या. मात्र आजपासून भारतीयांना स्मार्टफोन, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीनसह सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी खिसा जास्त रिकामा करावा लागणार नाही, कारण सरकारने आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. वास्तविक, सरकारने जीएसटी दर कमी केला आहे, त्यानंतर ही उपकरणे …

Read More »

केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा मोठा निर्णयः स्मॉल सेव्हिंगज् व्याज दरात उद्यापासून वाढ वर्षभरासाठी बचत खात्यात पैसे ठेवल्यास ६.९ टक्के मिळणार व्याज

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज एक परिपत्रक काढत बचत खात्यां अर्थात सेव्हिंगज् खात्यांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या ठेंवीवरील व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय जाहिर केला आहे. विशेष म्हणजे हे नवे व्याज दर उद्या १ जुलै अर्थात उद्यापासून लागू होणार असल्याचे केंद्र सरकारकडून जाहिर करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहिर केल्यानुसार बचत ठेवींवर ४.० …

Read More »

उद्योग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ठरलं, या ६ जिल्ह्यातील गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मान्यता १ लाख २० हजार रोजगार निर्मितीचे लक्ष्य

महाराष्ट्रात येवू घातलेले उद्योग शेजारच्या गुजरात तसेच भाजपा शासित राज्यात जात असल्याची ओरड विरोधकांकडून होत असताना बुधवारी पार पडलेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या विशाल प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. हे प्रकल्प पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई याभागात होणार असून यामुळे …

Read More »

महाराष्ट्राला विविध श्रेणीत ५ पुरस्कार शासकीय ई-बाजारात महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी

महाराष्ट्राने शासकीय ई-बाजार मध्ये लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत एकूण ५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्यावतीने येथील वाणिज्य भवनमध्ये शासकीय-ई-बाजारपेठ (Government e Marketplace (GeM)) ला प्रोत्साहन देण्यासाठी ‘क्रेता-विक्रेता गौरव पुरस्कार २०२३’ प्रदान सोहळयाचे आयोजन सोमवारी सायंकाळी करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री …

Read More »