केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज एक परिपत्रक काढत बचत खात्यां अर्थात सेव्हिंगज् खात्यांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या ठेंवीवरील व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय जाहिर केला आहे. विशेष म्हणजे हे नवे व्याज दर उद्या १ जुलै अर्थात उद्यापासून लागू होणार असल्याचे केंद्र सरकारकडून जाहिर करण्यात आले आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहिर केल्यानुसार बचत ठेवींवर ४.० इतके व्याज १ जानेवारी ते ३० जून अखेरपर्यंत आणि त्यापुढील १ जुलै ते ३०-९-२०२३ सारखेच राहणार आहे. तसेच या जुलै ते ऑक्टोंबर या कालावधीत १ वर्षासाठी बचत खात्यात ठेव ठेवल्यास ६.९ टक्के (पूर्वी ६.८ टक्के) व्याज मिळणार आहे. तर २ वर्षासाठी बचत खात्यात ठेवल्यास ७.० टक्के (पूर्वी ६.९ टक्के) इतके व्याज मिळणार आहे.
बचत खात्यांमध्ये ३ वर्षासाठी रक्कम ठेव ठेवल्यास पूर्वी आणि आता नव्या व्याज दरानुसार ७ टक्के इतकेच व्याज मिळणार आहे. पाच वर्षासाठी ठेवी ठेवल्यास पूर्वी आणि आता ७.५ टक्के इतके व्याज मिळणार आहे. चालू (रिकरींग) खात्यातील ठेवींसाठी ६.५ टक्के (पूर्वी ६.२) इतके व्याज मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या बचत खात्यात ठेवण्यात येणाऱ्या ठेवींवर पूर्वी आणि आता नव्या दराप्रमाणे ८.२ टक्के व्याज दर तसेच कायम ठेवण्यात आले आहेत.
त्याचबरोबर मासिक बचत योजनेंत्रगत ७.४ टक्के व्याज, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील बचतीसाठी ७.७, तर पॉव्हिडंट फंड योजनेतंर्गत ठेवण्यात आलेल्या ठेवीवर ७.१ व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. याशिवाय किसान विकास पत्रवर मिळणाऱ्या व्याजातही कोणताही बदल करण्यात आला नसून त्याचे व्याज दर ७.५ टक्के आणि सुकन्या समृध्दी योजनेखालील ठेवींच्या व्याज दर ८ टक्के इतकाच व्याज दर कायम ठेवण्यात आले आहे.
Government of India increased interest rates on select small saving schemes pic.twitter.com/GolYZxT925
— ANI (@ANI) June 30, 2023