Breaking News

जीवन विमा आणि आरोग्य विमा यातील फरत माहिती आहे का ?

आपलं आणि कुटुंबाचं भविष्य सुखकर करण्यासाठी विमा उतरवून गुंतवणूक करतं. जीवन विमा आणि आरोग्य विमा सर्वात महत्त्वाचे मानले जातात, कारण याचा संबंध थेट व्यक्तीच्या आरोग्याशी आहे. जीवन विमा आणि आरोग्य विमा व्यक्तीचं आजारपण किंवा मृत्यू झाल्यास आर्थिक संरक्षण देतात. पण जीवन विम्याचे स्वरूप आयुर्विम्यापेक्षा थोडे वेगळं आहे. जीवन विमा आणि आरोग्य विमा या दोघांमध्ये फरक आहे. या दोघांमधील फरक समजून घ्या.

चला जाणून घेऊया विम्याचा मुख्य फायदा

जीवन विम्यामध्ये, विमा रक्कम व्यक्तीच्या नॉमिनीला दिली जाते. तर आरोग्य विम्यामध्ये रोग, मर्यादित वैद्यकीय परिस्थिती आणि इतर अटींवरील उपचारांचा खर्च जास्तीत जास्त कव्हरेजची रक्कम समाविष्ट असते. लाइफ इन्शुरन्समध्ये ग्राहकाला मॅच्युरिटी किंवा सरेंडर फायदे मिळतात.

काही आरोग्य विम्यामध्ये कोणताही दावा नो क्लेम बोनसशी जोडला जाऊ शकतो. काही मोफत आरोग्य तपासणी सुविधा उपलब्ध होऊ शकते. तसेच जीवन विम्यात केलेली गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम ८० स, कलम १० (१०डी ) अंतर्गत करमुक्त आहे. तर आरोग्य विम्याच्या अंतर्गत, आयकर कायद्याच्या कलम ८० डी अंतर्गत कर सूट उपलब्ध आहे.

जीवन विमा वैयक्तिक किंवा समूह संरक्षणाच्या कक्षेत येतो. आरोग्य विमा वैयक्तिक, कुटुंब किंवा समूह संरक्षणाच्या कक्षेत येतो. लाइफ इन्शुरन्समध्ये मुदत योजना, बचत, मुलांशी संबंधित किंवा सेवानिवृत्ती योजनांचा समावेश होतो. आरोग्य विमा सर्वसमावेशक आरोग्य विमा योजना आणि गंभीर आजार कव्हरेज देते.

ग्राहकाचा अकाली मृत्यू झाल्यास जीवन विमा तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देतो. तुमच्या कुटुंबाला तुमच्या मृत्यूनंतर त्यांचे जीवन जगण्यास आर्थिक मदत करू मिळते. आरोग्य विम्यामध्ये आजारपणात हॉस्पिटलायझेशन आणि उपचाराचा खर्च समाविष्ट आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

बँकांना सलग ६ दिवस सुट्टी, यादी पहा सुट्ट्यांची यादी पहा

भारतात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *