Breaking News

बंद पडलेल्या कंपन्यांच्या जमिनी विकून कामगारांची देणी द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील अनेक भागात लहान-मोठ्या कंपन्या बंद पडत आहेत. मात्र या कंपन्यांमध्ये काम करत असलेल्या कामगारांना त्यांच्या पगारी व अन्य देणी अद्याप मिळात नाहीत. त्यामुळे अशा बंद पडलेल्या कंपन्यांच्या जमिनी विकून कामगारांची थकीत देणी देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपसरचिटणीस अमर देशमुख यांनी राज्य सरकारकडे एका निवेदनाद्वारे केली.
आर्थिक मंदीमुळे अनेक कंपन्यांना आर्थिक फटका बसत आहे. तसेच यातील अनेक कंपन्यांना टाळे लागत आहे. त्यामुळे या बंद पडत असलेल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. कामगारांचे अधिकचे नुकसान होवू नये यासाठी सरकारने पुढाकार घेत बंद पडलेल्या कंपन्यांच्या जमिनी विकून कामगारांची देणी द्यावीत आणि त्या जमिनी गरजू उद्योजकाला उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

एचडीएफसी म्युच्युअल फंडाबाबत मोठी घोषणा २६ एप्रिलपासून मॅन्युफॅक्चरींग फंड बाजारात

एचडीएफसी HDFC म्युच्युअल फंडाने २२ एप्रिल रोजी HDFC मॅन्युफॅक्चरिंग फंड लॉन्च करण्याची घोषणा केली. ओपन-एंडेड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *