Breaking News

अॅपलची मार्केट कॅप भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी २२४ लाख कोटींची जगातील सर्वात मोठी कंपनी, मार्केट कॅप भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त

मराठी ई-बातम्या टीम

वर्ष २०२२ च्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात म्हणजेच सोमवारी Apple च्या मार्केट कॅपने इतिहासात प्रथमच ३ ट्रिलियन डॉलरचा (सुमारे २२४ लाख कोटी रुपये) टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे हे मार्केट कॅप भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा खूप जास्त आहे. भारताचा जीडीपी २.६५ ट्रिलियन डॉलर आहे.
वर्षाच्या  ट्रेडिंगच्या पहिल्या दिवशी सिलिकॉन व्हॅली कंपनीच्या समभागांनी १८२.८८ डॉलरचा इंट्राडे विक्रमी उच्चांक गाठला, ज्यामुळे Apple चे बाजार मूल्य ३ ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक झाले.
ऑगस्ट २०१८ मध्ये, Apple १ ट्रिलियन डॉलरची किंमत असलेली पहिली यूएस कंपनी बनली. या कामगिरीला ४२ वर्षे लागली. दोन वर्षांनंतर कंपनीने २ ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडला. त्यानंतर कंपनीला पुढील ट्रिलियन डॉलर मार्केट कॅप गाठण्यासाठी फक्त १६ महिने आणि १५ दिवस लागले.
मायक्रोसॉफ्टही शर्यतीत सामील
टेक दिग्गज मायक्रोसॉफ्ट या वर्षीच्या ३ ट्रिलियन डॉलर क्लबमध्ये सामील होऊ शकते. Apple ने जानेवारी २००७ मध्ये आयफोन सादर केला तेव्हा कंपनीची किंमत ७३.४ अब्ज डॉलर होती.
वॉलमार्ट, नेटफ्लिक्ससारख्या कंपन्यांना मागे टाकले
हा विक्रम साधल्यानंतर अॅपलचे बाजारमूल्य वॉलमार्ट, डिस्ने, नेटफ्लिक्स, नायके, एक्सॉन मोबिल, कोका-कोला, कॉमकास्ट, मॉर्गन स्टॅनले, मॅकडोनाल्ड, एटी अँड टी, गोल्डमन सॅक्स, बोईंग, आयबीएम आणि फोर्ड यांच्यापेक्षा कितीतरी जास्त झाले आहे.  शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे अॅपलला या जादुई आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडी वाढ आवश्यक होती, जी कंपनीने सोमवारी गाठली.
भारत-ब्रिटनच्या जीडीपीपेक्षा अधिक
अॅपलने हे यश मिळवत भारत आणि ब्रिटनला मागे टाकले आहे. किंबहुना, ३ ट्रिलियन डाॅलरची कंपनी बनल्यानंतर तिचे मूल्य भारत आणि ब्रिटनच्या  जीडीपीपेक्षा जास्त झाले आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या जीडीपीचा आकार २०.४९ ट्रिलियन डॉलर आहे. या यादीत चीन दुसऱ्या क्रमांकावर (१३.४ ट्रिलियन डॉलर), जपान तिसऱ्या क्रमांकावर (४.९७ ट्रिलियन डॉलर) आणि जर्मनी चौथ्या क्रमांकावर (४ ट्रिलियन डॉलर) आहे. त्याच वेळी ब्रिटन २.८३ ट्रिलियन डॉलर (सुमारे २११ लाख कोटी रुपये) सह पाचव्या, फ्रान्स २.७८ ट्रिलियन डॉलरसह सहाव्या आणि भारत २.६५ ट्रिलियन डॉलर (सुमारे १९७ लाख कोटी रुपये) सह सातव्या स्थानावर आहे. अशाप्रकारे अॅपल या मार्केट कॅपद्वारे जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.
आयफोनची विक्री १९२ अब्ज डॉलर
सप्टेंबरमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात आयफोनची विक्री १९२ अब्ज डॉलरची झाली आहे. ही विक्री मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास ४० टक्के वाढली आहे. अॅपल ही अमेरिकेतील सर्वात मोठी करदाता कंपनी आहे. कंपनीने गेल्या पाच वर्षांत ४५ अब्ज डॉलर कर भरला आहे.

Check Also

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून डिव्हीडंड जाहिर १० रूपये प्रति शेअर डिव्हिडंडची घोषणा

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने सोमवारी वार्षिक १.८० टक्क्यांनी (YoY) एकत्रित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *