Breaking News

महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आज ८११ रूग्णांचे निदान तर संख्या ७ हजार ६२८ वर पोहोचली

मुंबई: विशेष प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या आजाराला रोखण्यासाठी एकाबाजूला राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असताना दुसऱ्याबाजूला या विषाणूने नियंत्रणात यायचे नाव काही घेत नसल्याचे दिसून येत आहे. या चालू आठवड्यात दुपट्टीने रूग्णांच्या संख्येत वाढ होण्याच्या घटना आतापर्यंत तीनवेळा घडल्या. मात्र आज दुपटीहून अधिक रूग्णांचे राज्यात निदान झाल्याचे आढळून आले आहे.
साधारणत: बुधवारी आणि गुरूवारी ७०० च्या आसापास आणि त्यापूर्वी ५०० पेक्षा जास्त रूग्णांची आकडेवारी नोंदविण्यात आली. मात्र काल या संख्येत ५० टक्क्याने घट होत ३९४ वर हा आकडा आला. त्यामुळे कोरोना नियंत्रणात येतोय अशी आशा निर्माण झाली. परंतु आता पुन्हा आज या संख्येत थेट ८११ ने वाढ झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा आज शनिवारी निदान झालेली वाढ ही तीन पट्टीत झाल्याचे दिसून येत आहे.
आज राज्यात २२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १३, ४ पुणे महानगरपालिका येथे तर १ मृत्यू मालेगाव येथे, १ पुणे ग्रामीणमध्ये , १ पिंपरी चिंचवडमध्ये, १ धुळे येथे तर १ मृत्यू सोलापूर शहरात झाला आहे.
मृत्यूंबद्दल अधिकची माहिती –
आज झालेल्या मृत्यूंपैकी १६ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या २२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ११ रुग्ण आहेत तर ८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या २२ मृत्यूंपैकी १३ रुग्णांमध्ये ( ५९ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३२३ झाली आहे.
प्रयोगशाळा तपासण्या –
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १,०८,९७२ नमुन्यांपैकी १,०१,१६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ७६२८. जण पॉझिटिव्ह आले आहेत.

अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका ५०४९ १९१
ठाणे ७१७ १५
पालघर १३९
रायगड ५६
मुंबई मंडळ एकूण ५९६१ २११
नाशिक १३१ १२
अहमदनगर ३५
धुळे २५
जळगाव १३
नंदूरबार ११
नाशिक मंडळ एकूण २१५ २०
१० पुणे १०३० ७३
११ सोलापूर ४६
१२ सातारा २९
पुणे मंडळ एकूण ११०५ ७९
१३ कोल्हापूर १०
१४ सांगली २६
१५ सिंधुदुर्ग
१६ रत्नागिरी
कोल्हापूर मंडळ एकूण ४५
१७ औरंगाबाद ५०
१८ जालना
१९ हिंगोली
२० परभणी
औरंगाबाद मंडळ एकूण ६१
२१ लातूर
२२ उस्मानाबाद
२३ बीड
२४ नांदेड
लातूर मंडळ एकूण १४
२५ अकोला २३
२६ अमरावती १९
२७ यवतमाळ २८
२८ बुलढाणा २१
२९ वाशिम
अकोला मंडळ एकूण ९२
३० नागपूर १०७
३१ वर्धा
३२ भंडारा
३३ गोंदिया
३४ चंद्रपूर
३५ गडचिरोली
नागपूर एकूण ११०
इतर राज्ये २५
  एकूण ७६२८ ३२३

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *