Breaking News

६ ते ७ आमदार कोरोना पॉझिटीव्ह विधान भवन प्रवेशाद्वारावरा २१०० जणांची तपासणी

मुंबई: विशेष प्रतिनिधी

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कामकाजात सहभाग घेणारे आमदार, मंत्री यांच्याबरोबरच प्रशासनातील अधिकारी यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकार आणि विधान भवनने घेतला. त्यानुसार ५ आणि ६ या दोन दिवसात २१०० जणांनी चाचणी केली. यापैकी ६१ जण बाधित आढळून आले असून यातील ६ ते ७ आमदार असल्याची माहिती विधान भवनातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

अधिवेशनाला हजेरी लावणे गरजेचे असल्याने अनेक आमदारांनी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर व्यवस्था करण्यात आलेल्या केंद्रावर चाचणी करणे पसंत केले. यात भाजपाचे दोन आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक महिला आमदार, शिवसेनेनेला पाठिंबा देणारा एक आमदार असे मिळून ६ ते ७ आमदार कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या आमदारांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे त्यांनी पुढील उपचाराच्यादृष्टीने रूग्णालयात दाखल होत असल्याचेही शेवटी त्यांनी सांगितले.

दरम्यान राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून दिली.

Check Also

३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *