Breaking News

१२२ मृत्यूसह एकूण संख्या ७५ हजाराच्या तर अॅक्टीव्ह रूग्णांची ४० हजाराच्या काटावर नव्याने २५६० रूग्णांचे निदान ९९६ जणांना घरी सोडले

मुंबई: प्रतिनिधी
कोरोनाग्रस्तांच्या बरे होण्याच्या टक्केवारीत जरी वाढ झालेली असली तरी दररोजच्या रूग्णसंख्येत किमान २ हजार रूग्णांच्या नोंदीत कमी आलेली नाही. त्यातच आज १२२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून राज्यात आज २५६० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाल्याने एकूण संख्या आता ७४ हजार ८६० पर्यंत पोहोचली आहे. आज नवीन ९९६ कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेल्याने बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या ३२ हजार ३२९ वर पोहोचली असून एकूण ३९ हजार ९३५ ऍक्टिव्ह रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रुग्ण वाढीचा आणि रुग्ण दुप्पट होण्याचा वेग – १ मे ते १ जून या कालावधीत राज्यातील रुग्ण वाढीचा वेग क्रमशः कमी होत असून १ जून रोजी तो देशाच्या सरासरी पेक्षा ( ४.७४ % ) देखील कमी झालेला आहे, हे स्पष्ट झाले.त्याचवेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे. यावरुन राज्यातील कोविड १९ प्रसाराचा वेग मंदावत असल्याचे स्पष्ट होते आहे.

दिनांक रुग्ण वाढीचा दर रुग्ण दुपटीचा वेग
१ मे ७.७६ % ९.२७ दिवस
१५ मे ६.२३ % ११.५६ दिवस
३० मे ४.७२ % १५.२६ दिवस
१ जून ४.१५ % १७.३५ दिवस

सध्या राज्यात ५,७१,९१५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७१,९१२ खाटा उपलब्ध असून सध्या ३३,६७४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे ६० मुंबई -४९, उल्हासनगर -३, नवी मुंबई -३, ठाणे – २,मीरा भाईंदर -१, वसई विरार -१,  भिवंडी -१.
नाशिक धुळे -४, जळगाव -२, अहमदनगर – १,नंदूरबार -१
पुणे २९ पुणे  -१९, सोलापूर -१०
कोल्हापूर कोल्हापूर -२
औरंगाबाद १७ औरंगाबाद मनपा १६, जालना -१
लातूर उस्मानाबाद -१
अकोला अकोला -२
इतर राज्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि प. बंगाल मधील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे.

 

एकूण रूग्ण, बरे झालेले रूग्ण, मृत पावणारे रूग्ण आणि अॅक्टीव्ह रूग्णांची जिल्हानिहाय माहिती.

अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई महानगरपालिका ४३४९२ १७४७२ १४१७ २४५९७
ठाणे १०८६५ ३९९२ २४० ६६३३
पालघर ११९९ ४४७ ३४ ७१८
रायगड १२३८ ६४५ ५१ ५४०
नाशिक १२३५ ९४२ ६८ २२५
अहमदनगर १६५ ६२ ९५
धुळे १७७ ९४ २० ६३
जळगाव ७८१ ३३० ७४ ३७७
अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
नंदूरबार ३७ २८
१० पुणे ८४६३ ४५८५ ३६७ ३५११
११ सोलापूर १०३२ ४४८ ८५ ४९९
१२ सातारा ५६४ २०६ २२ ३३६
१३ कोल्हापूर ६०७ २१३ ३८८
१४ सांगली १२६ ६३ ५९
१५ सिंधुदुर्ग ७८ ७०
१६ रत्नागिरी ३१४ ११८ १९१
१७ औरंगाबाद १६५३ १०९५ ८४ ४७४
१८ जालना १५४ ५९ ९३
१९ हिंगोली १९३ १०६ ८७
२० परभणी ७३ २४ ४८
२१ लातूर १२५ ६९ ५३
२२ उस्मानाबाद ९१ ४० ४९
२३ बीड ४९ २७ २१
२४ नांदेड १३५ ९९ ३०
२५ अकोला ६४७ ३५८ ३३ २५५
२६ अमरावती २६१ १५८ १६ ८७
२७ यवतमाळ १४८ ९९ ४८
२८ बुलढाणा ७४ ४५ २६
२९ वाशिम
३० नागपूर ६३५ ३९२ ११ २३२
३१ वर्धा
३२ भंडारा ३७ १२ २५
३३ गोंदिया ६६ ४८ १८
३४ चंद्रपूर २७ २५
३५ गडचिरोली ३९ १२ २७
  इतर राज्ये /देश ६३ १८ ४५
  एकूण ७४८६० ३२३२९ २५८७ ३९९३५

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *