Breaking News

कोरोना: राज्यातील २५५३ संख्येसह मुंबई पोहोचली ५० हजारावर : रिकव्हरी रेट वाढला राज्यात १०९ जणांचा मृत्यू तर मुंबई-ठाण्यात आतापर्यंत २१३४ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी
मागील २४ तासात राज्यात २५५३ नव्या कोरोनाग्रस्तांची आणि १०९ जणांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. राज्यातील एकूण बाधीतांची संख्या ८८ हजार ५२८ वर पोहोचली असून यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४४ हजार ३७४ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील एकूण रूग्णसंख्येपैकी ५० हजार ८५ तर मुंबई महानगरात २१३४ जणांचा आतापर्यत मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
तसेच आज बरे होवून १६६१ रूग्ण घरी गेले असून घरी जाणाऱ्यांची एकूण संख्या ४० हजार ९७५ वर पोहोचली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ४६.२८ % एवढे आहे. कालपर्यत हाच रेट ४५ टक्के होता. त्यात आता वाढ होवून ४६.२८ टक्क्याने वाढला. राज्यातील मृत्यू दर – ३.५७ %. सध्या राज्यात ५,६४,७३६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५,७५९ खाटा उपलब्ध असून सध्या २६,७६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३५१० झोन क्रियाशील असून आज एकूण १७,८९५ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६६.८४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य मंडळ आज नोंद झालेले एकूण मृत्यू तपशील
ठाणे ७० मुंबई -६४, कल्याण डोंबिवली – २, उल्हास नगर – १, वसई विरार -१,भिवंडी -१, ठाणे -१
नाशिक १३  नाशिक -२, जळगाव – ६, धुळे – ४, अहमदनगर -१
पुणे १३ पुणे  -७, सोलापूर -६
कोल्हापूर रत्नागिरी -३
औरंगाबाद औरंगाबाद – ८, जालना – १
लातूर नांदेड -१

 

अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई महानगरपालिका ५००८५ २२०३२ १७०२ २६३४५
ठाणे १३५२८ ५०८१ ३३६ ८११०
पालघर १५६७ ६०८ ४१ ९१८
रायगड १४६१ ८०५ ५५ ५९९
नाशिक १५९२ १०२७ ९१ ४७४
अहमदनगर २०८ ११८ ८१
धुळे २६१ ११८ २५ ११८
जळगाव १०८१ ४९० ११५ ४७६
अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
नंदूरबार ४० २८
१० पुणे ९८७७ ५७४३ ४१३ ३७२१
११ सोलापूर १४१९ ६२० ११० ६८९
१२ सातारा ६४० ३०९ २७ ३०४
१३ कोल्हापूर ६४८ ३९४ २४६
१४ सांगली १७० ८९ ७७
१५ सिंधुदुर्ग ११३ २७ ८६
१६ रत्नागिरी ३७१ १८२ १३ १७६
१७ औरंगाबाद २०३६ १२३१ १०० ७०५
१८ जालना २०८ १३० ७३
१९ हिंगोली २१४ १६४ ५०
२० परभणी ७८ ४६ २९
२१ लातूर १३८ १०२ ३२
२२ उस्मानाबाद १२५ ६९ ५३
२३ बीड ५६ ४४ ११
२४ नांदेड १७० ११० ५२
२५ अकोला ८३४ ४४३ ३६ ३५४
२६ अमरावती २९९ १७३ १८ १०८
२७ यवतमाळ १६३ ११५ ४६
२८ बुलढाणा ९५ ५४ ३८
२९ वाशिम १०
३० नागपूर ७६१ ४६६ ११ २८४
३१ वर्धा ११
३२ भंडारा ४१ २४ १७
३३ गोंदिया ६८ ६४
३४ चंद्रपूर ४२ २५ १७
३५ गडचिरोली ४४ ३१ १३
  इतर राज्ये /देश ७५ १९ ५६
  एकूण ८८५२८ ४०९७५ ३१६९ १० ४४३७४

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *