Breaking News

कोरोना : मुंबई आणि महानगरात संख्या स्थिर तर पुण्याची वाटचाल ५० हजाराकडे १४ हजार ७१८ नवे बाधित, ९१३६ जण घरी, ३५५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत असली तर दुसऱ्याबाजूला बरे होणाऱ्या रूग्णांची संख्याही चांगल्यापैकी वाढताना दिसत आहे. मुंबई शहर आणि महानगरातील ८ महानगरपालिका आणि ७ नगरपालिकांमधील अॅक्टीव्ह रूग्ण स्थिर आहे. मागील २० दिवसांहून अधिक काळ या दोन्ही ठिकाणी १९ हजार ते २० हजार या दरम्यानच संख्या कायम आहे. त्यामुळे मुंबईसह महानगरातील रूग्णसंख्या स्थिर असल्याचे दिसून येत आहे. मात्र पुणे जिल्ह्याची अॅक्टीव्ह रूग्ण संख्या वाढताना दिसत असून आज अखेर ४६ हजारावर येथील संख्या पोहोचली असून ५० हजाराच्या दिशेने येथील रूग्ण संख्येची वाटचाल सुरु असल्याचे दिसून येत आहे.

मागील २४ तासात १४ हजार ७१८ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण रूग्णांची संख्या ७ लाख ३३ हजार ५६८ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ७८ हजार २३४ वर पोहोचली आहे. तसेच ९ हजार १३६ जण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ५ लाख ३१ हजार ५६३ वर पोहोचली असून ३५५ मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७२.४६ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३८,६२,१८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७,३३,५६८ (१८.९९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,२४,२३२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३३,६४१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १३५० १४०८८८ ३० ७५३५
ठाणे २३८ १८७८७ १२ ४९१
ठाणे मनपा १८३ २५९१६ ९३५
नवी मुंबई मनपा ४०५ २७१५५ ११ ६१३
कल्याण डोंबवली मनपा २७८ ३०९७७   ६२६
उल्हासनगर मनपा २१ ७७८९   २८२
भिवंडी निजामपूर मनपा १६ ४४२१ ३१२
मीरा भाईंदर मनपा १८९ १२३२९ ४१८
पालघर १३० ७६३३ १२९
१० वसई विरार मनपा १७६ १६८३०   ४३२
११ रायगड ३०५ १६२७८ १३ ४५९
१२ पनवेल मनपा २१४ ११८६५ २८९
  ठाणे मंडळ एकूण ३५०५ ३२०८६८ ८३ १२५२१
१३ नाशिक २१९ ८६४१ १५ २२४
१४ नाशिक मनपा ७४० २४५७० १६ ४७८
१५ मालेगाव मनपा ४६ २४०९ १११
१६ अहमदनगर ३४७ १०४३१ १५६
१७ अहमदनगर मनपा २५८ ८०७० ११५
१८ धुळे ७२ ३७१४ १०२
१९ धुळे मनपा ७८ ३३९९ ९३
२० जळगाव ६०३ १८९२७ ६४६
२१ जळगाव मनपा ९४ ५७०० १५८
२२ नंदूरबार १४३ २२१८ ६५
  नाशिक मंडळ एकूण २६०० ८८०७९ ५८ २१४८
२३ पुणे ८१९ २२९५६ १२ ६९०
२४ पुणे मनपा १७७२ ९४८९७ ३५ २४५३
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०८५ ४४०९२   ७७३
२६ सोलापूर २५१ ११३७८ १४ ३११
२७ सोलापूर मनपा ५६ ६६७३ ४२४
२८ सातारा ५३२ ११५३० ३१३
  पुणे मंडळ एकूण ४५१५ १९१५२६ ६७ ४९६४
२९ कोल्हापूर ३५२ १३६९३ २२ ४०८
३० कोल्हापूर मनपा १५१ ५८९५ १५४
३१ सांगली २४७ ४१४८ ११ १४५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २७६ ६४८८ २११
३३ सिंधुदुर्ग १८ १०४९   १६
३४ रत्नागिरी ६४ ३६७६   १२९
  कोल्हापूर मंडळ एकूण ११०८ ३४९४९ ४४ १०६३
३५ औरंगाबाद १३५ ७५८८ १२२
३६ औरंगाबाद मनपा ११९ १४४४० ५१९
३७ जालना ४३ ४०५२ १२७
३८ हिंगोली ५९ १३५२ ३१
३९ परभणी ४८ ११३४   ३४
४० परभणी मनपा २५ १२०९   ३६
  औरंगाबाद मंडळ एकूण ४२९ २९७७५ ११ ८६९
४१ लातूर ८५ ४१७९ १४८
४२ लातूर मनपा १२८ ३०५६ ९९
४३ उस्मानाबाद ४९ ५३७७ १४५
४४ बीड ५६ ४४३२ १०७
४५ नांदेड १११ ३४२९ १८ १०३
४६ नांदेड मनपा १८२ २५९० १३ ९३
  लातूर मंडळ एकूण ६११ २३०६३ ४० ६९५
४७ अकोला ४२ १५४४ ५९
४८ अकोला मनपा १२ २१२४   ९२
४९ अमरावती ४५ १२२२   ३२
५० अमरावती मनपा ८६ ३४९७   ८०
५१ यवतमाळ ११७ २८६१ ६९
५२ बुलढाणा ६७ ३०४३ ७१
५३ वाशिम २८ १५५७   २५
  अकोला मंडळ एकूण ३९७ १५८४८ ४२८
५४ नागपूर १५२ ५७६६ ८२
५५ नागपूर मनपा १०८६ १७८५६ ३४ ५३६
५६ वर्धा ४१ ७२७ १६
५७ भंडारा ३९ ८६१ २१
५८ गोंदिया ६५ १२१५   १५
५९ चंद्रपूर ७४ ११६०  
६० चंद्रपूर मनपा ४९ ५२८  
६१ गडचिरोली २५ ६५०  
  नागपूर एकूण १५३१ २८७६३ ४३ ६८६
  इतर राज्ये /देश २२ ६९७ ७०
  एकूण १४७१८ ७३३५६८ ३५५ २३४४४

आज नोंद झालेल्या एकूण ३५५ मृत्यूंपैकी २३६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू  हे नागपूर -७, ठाणे -६, नाशिक -६,  पुणे -५, रायगड -३, सोलापूर -३, अहमदनगर- ३, औरंगाबाद -१, जळगाव – १ आणि कर्नाटक -१  असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १४०८८८ ११३५७७ ७५३५ ३१३ १९४६३
ठाणे १२७३७४ १०३४६३ ३६७७ २०२३३
पालघर २४४६३ १७१४० ५६१   ६७६२
रायगड २८१४३ २१९४६ ७४८ ५४४७
रत्नागिरी ३६७६ २१२६ १२९   १४२१
सिंधुदुर्ग १०४९ ५७१ १६   ४६२
पुणे १६१९४५ १११९०५ ३९१६   ४६१२४
सातारा ११५३० ६६८८ ३१३ ४५२७
सांगली १०६३६ ६१२६ ३५६   ४१५४
१० कोल्हापूर १९५८८ १२८२६ ५६२   ६२००
११ सोलापूर १८०५१ १२९३२ ७३५ ४३८३
१२ नाशिक ३५६२० २४२८३ ८१३   १०५२४
१३ अहमदनगर १८५०१ १४३७८ २७१   ३८५२
१४ जळगाव २४६२७ १६८१९ ८०४   ७००४
१५ नंदूरबार २२१८ ११२७ ६५   १०२६
१६ धुळे ७११३ ५००१ १९५ १९१५
१७ औरंगाबाद २२०२८ १५६४९ ६४१   ५७३८
१८ जालना ४०५२ २५२९ १२७   १३९६
१९ बीड ४४३२ २६०० १०७   १७२५
२० लातूर ७२३५ ४१११ २४७   २८७७
२१ परभणी २३४३ ९६८ ७०   १३०५
२२ हिंगोली १३५२ १०६१ ३१   २६०
२३ नांदेड ६०१९ २९३८ १९६   २८८५
२४ उस्मानाबाद ५३७७ ३२५९ १४५   १९७३
२५ अमरावती ४७१९ ३५६५ ११२   १०४२
२६ अकोला ३६६८ २९२३ १५१ ५९३
२७ वाशिम १५५७ १२४८ २५ २८३
२८ बुलढाणा ३०४३ २०४८ ७१   ९२४
२९ यवतमाळ २८६१ १८४९ ६९   ९४३
३० नागपूर २३६२२ १२६८६ ६१८ १०३१५
३१ वर्धा ७२७ ३७६ १६ ३३४
३२ भंडारा ८६१ ५७९ २१   २६१
३३ गोंदिया १२१५ ७७५ १५   ४२५
३४ चंद्रपूर १६८८ ९३४ १५   ७३९
३५ गडचिरोली ६५० ५५७   ९२
  इतर राज्ये/ देश ६९७ ७०   ६२७
  एकूण ७३३५६८ ५३१५६३ २३४४४ ३२७ १७८२३४

Check Also

३ऱ्या लाटेत ६० लाख नागरीक बाधित होण्याचा धोका: केंद्राकडून १ कोटी ६० लाख लसी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोक बाधित झाले, दुसऱ्या लाटेत ४० लाख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *