Breaking News

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रीच बोलले बच्चू कडू संवेदनशील नेते आहेत

अमरावतीच्या अचलपूर येथील अपक्ष आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद टोकाला पोहचल्याचे मागील काही दिवसांमध्ये दिसून आले आहे. दोघांकडूनही ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहे. अलीकडेच राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर …

Read More »

जयंत पाटील यांची मागणी, सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना मदत देण्याची सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आता तरी सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. यावेळी जयंत पाटील म्हणाले,  लवकरच गुजरात राज्याच्या निवडणुका आहेत. आम आदमी पक्ष तिथे …

Read More »

दिपक केसरकर म्हणाले, बच्चू कडूंसोबत फक्त दोन आमदार

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजप व शिवसेनेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून झालेलं इनकमिंग, तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. ही स्थापन करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी भल्या सकाळी केलेला शपथविधी, एकनाथ शिंदे यांचे बंड हे राज्याच्या राजकारणातील उलटफेरां मधील मैलाचे दगड ठरतील. गेल्या …

Read More »

काँग्रेसची मागणी, आमदार रवी राणांनी केलेल्या आरोपांची ED, CBI चौकशी करा गुवाहाटीला जाण्यासाठी कोणी किती खोके घेतले हे जनतेसमोर आले पाहिजे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आमदार रवी राणा यांनी राज्याचे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून कोण किती खोके घेऊन गुवाहाटीला गेले होते याची ईडी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

आदित्य ठाकरेंचा टोलाः गद्दारांनी खोके स्वतःला ठेवले, मदतीसाठी दिले नाहीत

राज्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. शेतीच्या शेती वाहून गेलेली असताना राज्य सरकार मात्र उत्सवांमध्ये व्यस्त आहे. ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. अशातच शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे …

Read More »

महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा? मतदार नोंदणी करा निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न सुटेपर्यंत राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्याचा कायदा विधीमंडळाने मंजूर केला आहे. विशेष म्हणजे राज्यपालांनीही या कायद्यावर सही केल्याने कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक तारखांचा खेळ थांबवला असून, स्थानिक …

Read More »

नाना पटोलेंचा आरोपः नोटांना धार्मिक रंग देऊन बुडणा-या अर्थव्यवस्थेवरून लक्ष वळविण्याचा प्रयत्न

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघेही राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे देशाने अनेकदा पाहिले आहे. नोटांवर देवी देवतांचे फोटो छापण्याची मागणी करून अरविंद केजरीवाल मोदींच्या मदतीला धावले असून बुडणा-या अर्थव्यवस्थेवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नोटांना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न …

Read More »

अरविंद सावंतांचा सवाल, निवडणूक आयोग बंद असताना त्या बातम्या कशा आल्या?

मागील तीन-चार दिवस दिवाळीची सुट्टी असताना सर्वच प्रसारमाध्यमांमध्ये शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या ८.५० लाख प्रतिज्ञापत्रे फॉलमेटनुसार नसल्याने रद्द झाल्याचे वृत्त प्रसारीत झाले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात सर्वच प्रसारमाध्यमांना …

Read More »

न्यायालयाचा निर्णयः पत्नीला घरातील कामे करायला सांगणे म्हणजे क्रुरपणा नव्हे

जर विवाहीत स्त्रीला अर्थात पत्नीला कुटुंबियासाठी घरातील कामे करायला सांगितले तर तो क्रुरपणा नव्हे तसेच काम सांगण्या मागचा उद्देश हा घरकाम करणाऱ्या मोलकरणीशी होऊ शकत नाही असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमुर्ती विभा कांकणवाडी आणि राजेश एस.पाटील या द्विसदस्यीय खंडपीठाने सारंग दिवाकर आमले विरूध्द …

Read More »

ऐन दिवाळीत ठाकरे गटाचे किर्तीकर आणि शिंदे गटाच्या कदम यांची भेट

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांच्यासह ४० जण बाहेर पडले. त्यानंतर भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे स्वत: ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांची भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ऐन दिवाळीची धामधुम …

Read More »