Breaking News

अरविंद केजरीवालांचे आता हिंदू कार्ड: नोटेवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापा

नवी दिल्ली पाठोपाठ पंजाबमधील विधानसभा निवडणूकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांच्या विचारानुसार वाटचाल करणार असल्याची ग्वाही देत सत्ता काबीज केली. मात्र आता आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रिझर्व्ह बँकेच्या नोटेवर गांधींच्या फोटोसोबतच लक्ष्मी आणि गणपती या …

Read More »

भास्कर जाधव म्हणाले, आनंदाचा शिधा म्हणजे कुचेष्टाच

आधीच महागाईने सामान्य नागरिकांचे कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे अंत्योदय आणि केशरी कार्डधारकांना ही दिवाळी गोड करता यावी, यासाठी रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र अनेक ठिकाणी या वस्तू पोहचल्याच नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर आनंदाचा शिधा ही सामग्री मिळाली नसल्याने विरोधकांकडून …

Read More »

किंग्ज चार्ल्स यांच्याकडून ऋषी सुनक यांच्यावर पंतप्रधान पदाची जबाबदारी

भारतीय वंशाचे ब्रिटनचे नेते ऋषी सुनक यांनी आज २५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला. प्रथेप्रमाणे ब्रिटनचे राजा किंग चार्ल्स यांनी सुनक यांची अधिकृतरित्या ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. सुनक हे ब्रिटनचे गेल्या चार वर्षांतले पाचवे पंतप्रधान आहेत. शिवाय ते माजी अर्थमंत्रीही आहेत. पंतप्रधान पदासाठी सत्ताधारी हुजूर पक्षात पेनी …

Read More »

राष्ट्रवादीचा पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना म्हणाला, डिलीव्हरी बॉय

आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीने तयारीला सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील वातावरण हळूहळू तापू लागलं आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत कुरघोडी करण्याचा प्रयत्न राजकीय नेतेमंडळी करताना दिसत आहेत. एकीकडे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असे शिवसेनेतील दोन गट एकमेकांना भिडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधक …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थीना मानधन केव्हा?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थीना दरमहा मानधन मिळण्याबाबतचा प्रस्ताव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातून वित्त विभाग, आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून वित्त विभागाकडे सादर करावा. असे निर्देश तत्कालीन ठाकरे मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी २८ ऑक्टोबर २०२१ रोजी देण्यात आले होते, आज वर्षे होऊन गेले. तरी हा प्रस्ताव …

Read More »

त्या चर्चेवर शिंदे गट म्हणतो, तुमच्याकडचे आमदार सांभाळा उध्दव ठाकरे गटावर साधला निशाणा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आपली सत्ता कशी येईल याचे डावपेच आखत सत्तांतर घडवण्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ५० आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील आमदारांनी भाजपाला पाठिंबा देत राज्यात नवीन सरकार स्थापन झाले. शिंदेंच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. …

Read More »

देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, उध्दव ठाकरेंना दिवाळी शुभेच्छा दिल्या नाहीत पण जरूर देऊ उध्दव ठाकरे यांच्याबरोबर युती करणार का? राजकारणात काहीही अशक्य नाही

अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात कटूता वाढल्याचे फडणवीस यांनी यावेळी मान्य केले. मात्र राजकारणात कटूता असू नये, वैमनस्य असू नये, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. कटुता असेल तर ती सगळ्यांनीच हळूहळू कमी केली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मी देखील करेन. पण एक चांगले आहे की सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी माझा अद्यापही …

Read More »

मुख्यमंत्री सुपुत्र खा. शिंदेही शिवतीर्थावर, नव्या युतीच्या चर्चेला उधाण

गणपती उस्तवात आणि त्यानंतर दिवाळीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवतीर्थावर जात राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात युती होणार …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, निवडणूका कधी होणार हे ईश्वर आणि न्यायालयाला ठाऊक महापलिका निवडणुकीबाबत संभ्रम कायम

मागील अडीच वर्षात राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपलेली आहे. तसेच या महापालिकांवर सध्या प्रशासकांची नियुक्ती राज्य सरकारने केलेली आहे. परंतु राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील गेलेले ओबीसींचे आरक्षण परत मिळाल्याशिवाय निवडणूका घ्यायच्या नाहीत असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले …

Read More »

कोणाच्या सांगण्यावरून, पशुधन विकास अधिकाऱ्यासाठी विधान भवन राबतेय?

राज्यातील आमदाराच्या हक्काचे ठिकाण असलेले आणि विकासाच्यादृष्टीने चर्चेचे ठिकाण हे विधान भवन आहे. मात्र या विधान भवनात सध्या अवर सचिव दर्जाच्या एका पशुधन विकास अधिकाऱ्याला सहसचिवाचा दर्जा देत आणि सेवा निवृत्तीनंतरही खास पाच वर्षाची मुदतवाढ देण्याचा घाट घालण्यात येत असल्याची माहिती विधान भवनातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. पदुम विभागातील अनिल शं.महाजन …

Read More »