Breaking News

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काश्मीरात स्थगितः काँग्रेसचे मोदींवर टीकास्त्र सुरक्षा यंत्रणेनेतील त्रुटीवरून भारत जोडो थांबली

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या अंतिम टप्प्यात असून येत्या ३० जानेवारी रोजी राहुल गांधी काश्मीरमध्ये तिरंगा फडकवणार आहेत. त्यानंतर या यात्रेची सांगता होणार आहे. मात्र राहुल गांधी यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा त्रुटी असल्याचा आरोप काँग्रेसने केला. विशेष म्हणजे यावेळी सुरक्षेच्या कारणामुळे काँग्रेसने आपली यात्रा सध्या …

Read More »

संजय राऊत यांच्या सल्ल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, उध्दव ठाकरेंनी सांगितल असत तर…. पवारांवरील आरोप हे पूर्वीच्या घटनांवरून त्याचा आता संबध नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार हे आजही भाजपाबरोबर आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटकपक्ष आक्रमक झाल्याचं बघायला मिळाले. याबाबत बोलताना शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत यायचं असेल तर टीका करणं …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, दगडांना नाचवत राहिलो पण आता खरे हिरे सापडले अद्वय हिरे यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेश सोहळ्यानंतर केली शिंदे गटावर टीका

नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांनी आज भाजपाला राम राम करत उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी हिरे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उध्दव ठाकरे यांनी हिरे यांना शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश दिला. या प्रवेश सोहळ्यानंतर उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधत म्हणाले, …

Read More »

अद्वय हिरे म्हणाले, भाजपा नेत्यांच्या सततच्या आठवणीमुळे अखेर फोन बंद करावा लागला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, भाजपा नेते अद्वय हिरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांना शिवबंधन बांधलं. यावेळी खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत उपस्थित होते. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अद्वय हिरे म्हणाले, भाजपाचे जे नेते इतक्या दिवस माझी आठवण …

Read More »

CM Eknath Shinde : निवडणूक सर्व्हेक्षणावर मुख्यमंत्री म्हणाले, आकडेवारी समोर असती तर अंदाज … इंडिया टूडे सी-व्होटरच्या सर्वेक्षणात भाजपा-शिंदे गटाला कमी जागा मिळणार असल्याचा अंदाज

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला अद्याप वर्षे दिड वर्षाचा कालावधी असतानाच देशासह महाराष्ट्रातील मतदारांचा कल कोणत्या पक्षाकडे आहे हे जाणून घेण्यासाठी इंडिया टूडे-सी व्होटर या कंपनीकडून नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जास्त जागा मिळणार असल्याचा तर भाजपा-शिंदे गटाला कमी जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे …

Read More »

लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्र्यांनी घेतला पंतप्रधानांच्या ‘परिक्षा पे चर्चा’त सहभाग विद्यार्थ्यांनो हसत खेळत परिक्षेला सामोरे जा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज्या शाळेतून शिक्षण घेतले तेथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले. ठाणे येथील किसन नगरमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या आठवणी जागवतानाच विद्यार्थ्यांना आणि पालकांना परिक्षेला सामोरे जाताना ताण घेऊन नका असा सल्ला दिला. त्याचबरोबर ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पंतप्रधानांचे …

Read More »

काँग्रेसचा आरोप, ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून शाळकरी मुलांमध्ये भाजपाचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘परिक्षा पे चर्चा’साठी शाळा व विद्यार्थी वेठीस

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशातील शाळकरी मुलांसाठी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम सरकारी असताना राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या आडून भारतीय जनता पक्ष शाळकरी मुलांमध्ये पक्षाचा प्रचार करत असून हे अत्यंत गंभीर असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे …

Read More »

शरद पवारांवरील आंबेडकरांच्या आरोपावर राऊतांचा बचाव तर पाटील यांच्याकडून अप्रत्यश दुजोरा शरद पवार भाजपाच्या संपर्कात संशय वाढला

राज्यातील आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती केल्याचे नुकतेच जाहिर केले. वंचितचा समावेश अद्याप महाविकास आघाडीत झालेला नसतानाच वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मविआ नेते शरद पवार हे भाजपाबरोबर होते, आणि आजही भाजपासोबत असल्याचा गंभीर आरोप केला. आंबेडकरांच्या या आरोपनंतर ठाकरे गटाचे खासदार …

Read More »

रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका, सरकार ४० नव्हे तर १३ कोटींसाठी चालवायचे असते… लोकच भूंकप घडवून आणतील

राज्यातील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकीत विजय मिळविल्यानतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी नायगांव येथे क्रांतीज्योतील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास भेट दिली. त्यानंतर सातारा क्लब येथे प्रसार माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. यावेळी रोहित पवार बोलताना म्हणाले, सरकार …

Read More »

हिंडेनबर्ग संशोधन संस्था म्हणते, अदानी उद्योगाने खोट्या आकड्यांचा घेतला आधार पोलखोलनंतर अदानी उद्योगाच्या शेअर किंमतीत घट

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून गौतम अदानी यांच्या उद्योगाचा विस्तार गुजरातपासून संबध भारतभर आणि परदेशातही होत आहे. तसेच अदानी ग्रुपच्या मालमत्तेतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून गौतम अदानी यांचा नामोल्लेखही केला जात असतानाच हिंडेनबर्ग या संशोधन संस्थेने आपला एक अहवाल प्रसिध्द करत अदानी …

Read More »