Breaking News

सरन्यायाधीशांच्या त्या मुद्यावर ठाकरे गटाचा युक्तीवाद, म्हणून राज्यपालांची बेकायदेशीर कृती… राजीनामा देणं बेकायदेशीर कृत्याचा परिणाम होता

सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष आणि शिवसेनेतील अपात्र आमदारांच्या याचिकेवर आज सकाळी ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिबल यांनी युक्तीवाद केल्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डि.वाय.चंद्रचूड यांनी तुम्ही म्हणता राज्यपालांचा निर्णय रद्द ठरवा आणि पूर्वीचे सरकार पुर्नःस्थापित करा. पण तुम्ही तर बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामाच …

Read More »

नाना पटोलेंचा खोचक सवाल, राज्याचे गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर जनता कशी सुरक्षित असेल? बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्रींच्या वसईतील कार्यक्रमाला परवानगी देऊ नका

राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस यांनीच सभागृहात सांगितले. या प्रकरणात एका मुलीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीर आहे त्याची चौकशी करुन जे सत्य असेल ते उघड झाले पाहिजे. परंतु राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नसेल तर राज्यातील जनता कशी सुरक्षित …

Read More »

अखेरचा युक्तीवाद करताना कपिल सिबल यांचे आवाहन, जर मध्यस्थी केली नाही तर एकही सरकार… राज्यपालांचा तो निर्णय रद्द करण्याची केली मागणी

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि अपात्रतेच्या निर्णयावर ठाकरे गटाची बाजू मांडण्यास कपिल सिबल यांनी काल सकाळपासून सुरुवात केली. मात्र काल राहिलेला अर्धवट युक्तीवाद कपिल सिबल यांनी आज पूर्ण केला. यावेळी बोलताना कपिल सिबल यांनी न्यायालयाच्या जाज्वल्य इतिहासाची आठवण करून देत म्हणाले, राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्याचा घेतलेला निर्णय रद्द …

Read More »

त्या प्रकाशित वृत्तावर अजित पवारांच्या प्रश्नावर फडणवीसांचा खुलासा, मला व माझ्या कुटुंबियांना अडकविण्याचा… अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या एफआयआरवर फडणवीसांचा सभागृहात खुलासा

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका इंग्रजी वर्तमान पत्राचा दाखला देत अजित पवार यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गावदेवी मलबार हिल पलीस ठाण्यात दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालातील नेमकी माहिती काय असा थेट सवाल केला. अजित पवार यांच्या प्रश्नार्थक माहितीमुळे …

Read More »

अजित पवार यांचा गंभीर इशारा, त्या विरोधात कडक भूमिका न घेतल्यास राज्याचे वाटोळे होईल अजित पवार यांचा गंभीर इशारा, कडक भूमिका न घेतल्यास राज्याचे वाटोळे होईल सामुहिक कॉपीसाठी टाकळी मानोरा दहावीचे परीक्षा केंद्र ताब्यात घेण्याचा प्रकार; कॉपी पुरविणाऱ्या जामावाकडून भरारी पथकावर लाठ्याकाठ्या घेऊन हल्ला...

अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी-मानुर (ता. पाथर्डी) येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीना कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्याकाठ्या घेऊन भरारी पथकावर दगडफेक करण्यात आली आहे. ते परीक्षा केंद्रच ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब अत्यंत गंभीर आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात असे कॉपीचे आणि पेपर फुटीचे प्रकार वारंवार घडत आहेत. हे प्रकार न …

Read More »

शेतकरी-कष्टकरी रस्त्यावर तर उपमुख्यमंत्री आणि विधानसभाध्यक्ष गाण्यात दंग गायक स्व.मुकेश यांच्या कार्यक्रमाला विधानसभेचे कामकाज सुरु असताना आवारात करमणूक कार्यक्रमाचे आयोजन

राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल एकतर रस्त्यावर फेकून देत आहेत किंवा नागरीकांना फुकट वाटत आहेत. याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्येंच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई दरम्यान लॉगमार्च काढला असून हा मोर्चा मुंबईच्या …

Read More »

उध्दव ठाकरेंचा खोचक टोला, खायचं तर मोकळंच होतं ना रान कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेच्या सभेमध्ये याच माणसाने नाटक केलं

महाविकास आघाडीचा मुंबईत मेळावा पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात चांगलीच फटकेबाजी केली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचारा विषयीची खदखद आपल्या भाषणात व्यक्त करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला. खायचं तर मोकळंच होतं ना रान, मी त्याबद्दल कधीच विचारलं नाही, …

Read More »

मविआ बैठकीनंतर नाना पटोलेंचा विश्वास, भाजपाला सत्तेतून हकालपट्टीची सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल काँग्रेस, एनसीपी व शिवसेनेच्या संघटीत ताकदीवर पुन्हा मविआच सत्तेवर येणार: बाळासाहेब थोरात

केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सत्तेच्या जोरावर संविधान आणि लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम करत आहे. आज देश मोठ्या अपेक्षेने महाराष्ट्राकडे पहात असून महाराष्ट्राच्या जनतेवर देशाची भिस्त आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राने कायमच देशाला दिली आहे. आता पुन्हा तेच काम होणार आहे. भाजपला सत्तेतून हाकलून देण्याच्या प्रक्रियेची …

Read More »

ठाकरे गटाकडून युक्तीवाद करताना कपिल सिबल यांची स्पष्टोक्ती, लोकशाहीत चौकटीतील… नाही तर आयाराम-गयाराम संस्कृती बळावेल

सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी शिंदे गटाचे वकील हरिष साळवे, कौल यांनी बाजू मांडल्यानंतर ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आज युक्तीवाद केला. तत्पूर्वी आज राज्यपालांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना राज्यपालांच्या भूमिकेवर परखड शब्दांत आक्षेप घेतला. तसेच, महाराष्ट्रातील या …

Read More »

अजित पवारांचा इशारा, …नाहीतर पोलिसांनाच संरक्षण देण्याची वेळ येईल पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता

राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस चोवीस तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात ३० हून अधिक हल्ले पोलिसांवर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांवर हल्ल्याची प्रवृत्ती बळावू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र …

Read More »