Breaking News

त्या प्रकाशित वृत्तावर अजित पवारांच्या प्रश्नावर फडणवीसांचा खुलासा, मला व माझ्या कुटुंबियांना अडकविण्याचा… अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या एफआयआरवर फडणवीसांचा सभागृहात खुलासा

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका इंग्रजी वर्तमान पत्राचा दाखला देत अजित पवार यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गावदेवी मलबार हिल पलीस ठाण्यात दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालातील नेमकी माहिती काय असा थेट सवाल केला. अजित पवार यांच्या प्रश्नार्थक माहितीमुळे विधानसभा सभागृहातील सर्वच सदस्य अवाक् झाले.

अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणात अनेक नावे समोर येत आहेत, मला आणि माझ्या कुटुंबीयांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता, राजकारणात लोक कोणत्या स्तरावर गेले आहेत, असा सूचक वक्तव्य करत या प्रकरणी योग्य चौकशी केली जाईल असे स्पष्ट केले.

या विषयीची बातमी काही वृत्तपत्रांनी सकाळीच प्रकाशित केली असून फडणवीस यांनी सभागृहात सांगितले की, काही संशयास्पद व्यक्तींनी पत्नीला गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. मी या आधीही सांगितले होते की मला व माझ्या कुटुंबियांना अडकवण्याचा प्रयत्न केले गेले. आधीचे मुंबई पोलीस आयुक्तांनी यातील गुन्हेगाराला सोडण्याची तयारी केली होती, तुम्ही आता मदत करा नाहीतर तुम्हालाही अडकवू अशा प्रकारच्या धमक्या यातील अनिल जयसिंघानीच्या मुलीने दिल्याचे फडणवीसांनी सभागृहाला सांगितले. पोलिस या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करतील असेही ते म्हणाले.

आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये अनुष्का जयसिंघानीचा उल्लेख आहे. या स्त्रीने अमृता फडणवीस यांना अनेक दिवस संपर्क केला. मैत्री करण्याचा प्रयत्न केला. आपण डिझाईनर आहोत अडचणीत आहोत. तुमची मदत हवी असे ती सांगत असल्याने अमृता फडणवीसांनी तिची भेट घेतली. एकदा तिने काही ड्रेस दिले व हे तुम्ही समारंभात वापरा म्हणजे माझ्या डिझाईनची प्रसिद्धी होईल असे तिने सांगितले. नंतर एकदा सोन्याचा दागिना दिला व हा तुम्ही वापरा असेही सांगितले. या गोष्टी अमृता फडणवीस यांनी परत करून टाकल्या नंतर तिने असे सांगायला सुरुवात केली की काही बुकींमार्फत आपण पैसे कमवू तेंव्हा अमृता फडणवीस यांनी तिच्याशी संबंध तोडून टाकल्याचेही फडणवीसांनी सांगितले.

नंतर अलिकडे परत अनुष्काने संपर्क केला व वडील एका प्रकरणात अडकले आहेत. त्यांना सोडवायला मदत करा आपल्याला एक कोटी मिळतील असे सांगितले. तेव्हा श्रीमती फडणवीस यांनी तिचा फोन तर ब्लॉक केलाच पण दुसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रारही दाखल केली. त्या काही तासात या अनुष्काबाईने अनोळखी फोनवरून चाळीस एक मेसेज पाठवले, त्यात व्हिडिओ क्लीप व लिखित संदेश असे दोन्ही होते. त्यात अमृता फडणवीस यंना देण्यासाठी हे डॉलर्स जमा केले आहेत अशी एक व्हिडिओ क्लीप पाठवली धमकी स्वरुपाचे अनेक मेसेज त्यात होते असेही अमृता फडणवीसांनी पोलिसांमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केल्याचे सांगितले.

या सर्व संदर्भात विधानसभेत पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अनिल जयसिंघानी ही व्यक्ती फरार आहे, त्यांच्या मुलीने अमृता हिला भेटणं सुरू केलं होतं, आपण फॅशन डिझायनर आहोत , त्यासोबत इतर गोष्टी सांगून तिने अमृता यांचा विश्वास संपादन केला, त्यानंतर वडिलांना मदत करण्याची विनंती केली. बुकिंकडून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करू अशी ऑफर दिली. वडिलांना मदत करण्यासाठी एक कोटीची नवीन ऑफर दिली. दागिने आणि पैसे देण्याची ऑफर देत धमकी ही दिली, त्यावर गुन्हा दाखल केला. या तपासात काही पोलिस अधिकारी, नेत्यांची ही नावे तिने घेतल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

Check Also

इराणच्या राजदूताचे आश्वासन, जहाजावरील भारतीय क्रु मेंबर्संना लवकरच सोडू

इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही यांनी मंगळवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, इराणच्या सैन्याने ताब्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *