Breaking News

Editor

पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा भार म्हाडावर मात्र ३ विकासकांशी करार करून कालबद्धरितीने पुनर्वसन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई: प्रतिनिधी येथील गोरेगांवमधील सिध्दार्थनगर (पत्राचाळ) येथील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करुन हजारो कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुनर्विकासाचे काम कालबद्धरितीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर म्हाडाने प्रस्तावित केल्याप्रमाणे सदर प्रकल्पामध्ये विक्री इमारतींचे बांधकाम जवळपास पूर्ण केलेल्या ३ विकासकांबरोबर म्हाडाचे …

Read More »

अधिवेशनासह या प्रश्नी भाजपाचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला अध्यक्षांची निवडणूक टाळून संवैधानिक व्यवस्था कोलमडली, राष्ट्रपतींना अहवाल पाठवा

मुंबई: प्रतिनिधी राज्यापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना केवळ दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्याच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आज भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी निर्देश देऊन सुद्धा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतली जात नाही. त्यामुळे राज्यातील संवैधानिक व्यवस्था कोलमडली असल्याचा अहवाल राष्ट्रपतींना पाठविण्यात यावा, ओबीसी आरक्षण पूर्ववत होईस्तोवर स्थानिक …

Read More »

१ जुलैपर्यंत राज्यभर कृषी संजीवनी मोहिम कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कृषी संजीवनी मोहिम राबविली जात आहे. या अंतर्गत दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. ही मोहिम १ जुलैपर्यंत सुरु राहणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. दरवर्षी १ …

Read More »

ही शिवशाही नाही ही तर बेबंदशाही भाजपा नेते विधानसभा मुख्य प्रतोद आमदार ॲड आशिष शेलार

कुडाळ: प्रतिनिधी शिवशाही शब्द शिवसेनेने केव्हाच सोडला. सेनेचं काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर मिळून राज्यात जे काही सुरु आहे ती बेबंदशाही असल्याची टीका भाजपा नेते विधानसभा मुख्य प्रतोद, आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज केली. ॲड आशिष शेलार सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून भाजपकडून जिल्ह्यात कुडाळ व मालवण येथे २५ हजार मास्क वाटप, ४०० …

Read More »

आशा वर्करना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ आणि स्मार्टफोन मिळणार : संप मागे कृती समिती आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या चर्चेनंतर माहिती

मुंबई : प्रतिनिधी मागील आठवड्यापासून आशा स्वंयसेविकांनी आपल्या विविध प्रश्नांसंबधी सुरु केलेले आंदोलन आजपासून मागे घेण्यात आले असून ५००० ऐवजी आशा स्वंयसेविकांना १५०० तर गटप्रवर्तकांना १७०० रूपये मानधन वाढ १ जुलैपासून देण्याची तयारी आणि विशेष भेट म्हणून स्मार्ट फोन देण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. त्यामुळे आशा स्वयंसेविकांचे हे …

Read More »

पटोलेंचा पुन्हा स्वबळाचा नारा; मोदी सरकारला जागा दाखवून देणार शेतक-यांशी संवाद साधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उत्तर महाराष्ट्र दौ-याला सुरुवात

फैजपूर-जळगाव: प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकार हे इंग्रज राजवटीपेक्षा जुलमी व अत्याचारी आहे. हे सरकार शेतकरी, कष्टकरी विरोधी असून शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवून देशोधडीला लावण्याचे काम करत आहे. शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यासाठी तीन काळे कृषी कायदे आणले आहेत. केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार घालवल्याशिवाय या देशातील शेतकरी, कष्टकरी यांचे अच्छे दिन येणार नाहीत …

Read More »

कोरोनामुक्त गावात १०वी- १२वीचे वर्ग सुरु होणार : अनाथांच्या शिक्षणाचा खर्च सरकारवर शक्यता पडताळून पहावी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता १० व १२  वी चे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पहावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत कोविडमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकार करणार असून …

Read More »

काँग्रेस, भाजपाच्या विरोधानंतरही ओबीसींच्या त्या रिक्त जागांसाठी निवडणूका १९ जुलै २०२१ रोजी मतदान; तर २० जुलै २०२१ रोजी निकाल-राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम व नागपूरमधील ५ जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांवरील सदस्यांच्या निवडणूकीसाठी असलेले ओबीसी आरक्षण रद्दबातल ठरले. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागांसाठी काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार आणि भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी या रिक्त जागांसाठी निवडणूका न घेण्याचे आव्हान केले. …

Read More »

पवारांची नवी आघाडी हा बातमीत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील संभाव्य आघाडी हा राजकारणात शून्य अस्तित्व असलेल्या आणि जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न असून अशी कितीही शून्ये एकत्र केली तरी त्यातून एक पूर्णांक तयार होत नसल्याने नवा हास्यास्पद प्रयोग यापलीकडे त्यातून काही निष्पन्न होणार नाही, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे …

Read More »

अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना मिळणार २ लाखापर्यंत कर्ज पहिल्या टप्प्यात ७५० बचतगटांना मिळणार योजनेचा लाभ-अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक

मुंबई : प्रतिनिधी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेद्वारे अल्पसंख्याक महिलांमधील उद्योजकतेला चालना देण्यात येणार असून त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. पहिल्या टप्प्यात …

Read More »