Breaking News

Editor

मविआचे २ मोठे निर्णय: १२ वीनंतर थेट २ऱ्या वर्ष इंजि.ला आणि मराठीत शिकता येणार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रतेत बदल करण्यात आले असून निश्चित केलेल्या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार असून पहिल्यांदाच अभियांत्रिकेचे शिक्षण मराठीत शिकण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात …

Read More »

ओबीसी आरक्षणप्रश्नी भाजपाचा २६ जूनला राज्यात चक्काजाम प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने समाजात अतिशय संतप्त भावना आहेत. न्यायालयात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे मोठा फटका समाजाला बसला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. आज भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली आणि ओबीसी …

Read More »

इलेक्ट्रीक वाहनांची चार्जिंग स्टेशन उभी राहणार : धोरण मसूदा सादर करा लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला गती देणे गरजेचे असून यासाठीचे सर्वंकष सुधारित धोरण निश्चित करावे व लवकरात लवकर ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांनी यासंबंधीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस परिवहन मंत्री ॲड.अनिल …

Read More »

चंद्रकांत पाटील यांनी केला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा निषेध विधिमंडळ अधिवेशनात आशा कर्मचाऱ्यांचा प्रश्न लावून धरू

पुणे : प्रतिनिधी आशा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मागण्या ऐकूनही घेतल्या नाहीत, याचा आपण निषेध करत असल्याचे सांगत विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात भारतीय जनता पार्टी या प्रश्नावर सरकारला धारेवर धरेल, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. समाजाच्या कोणत्याही घटकाने अन्यायाच्या …

Read More »

BreakTheChain या २५ जिल्ह्यांमध्ये ५ टक्केपेक्षा कमी पॉझिटीव्हीटी राज्य सरकारकडून जिल्हानिहाय पॉझिटीव्हीटीची माहिती जाहीर

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाला रोखण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांना रूग्णसंख्येच्या आधारावर लागू करण्यात आलेल्या निर्बंधात शिथिलता देण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून सर्व जिल्ह्यांचा साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दराची माहिती जारी केली. या दुसऱ्या आठवड्यात ५ टक्केपेक्षा कमी दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये आणखी ४ जिल्ह्यांची वाढ झाली असून गतवेळी २१ तर या आठवड्यात २५ जिल्ह्यांमध्ये ५ टक्के …

Read More »

फटकार मोर्च्यानंतर आता भाजपाचा शिवसेनेला इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आम्ही रोषही व्यक्त करायचा नाही का?

पुणे: प्रतिनिधी अयोध्या येथील राम मंदिराच्या विरोधात सतत काही विरोधी मुद्दे उपस्थित करणे काँग्रेस आणि देशविरोधी शक्तींकडून चालू असताना, शिवसेनेने त्या सुरात सूर मिसळू नये. तुम्ही काही लिहिले तर रोषही व्यक्त करायचा नाही, अशी दंडुकेशाही चालणार नाही, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही शिवसेना भवनासमोर घडलेल्या प्रकारावरून शिवसेनेला दिला. …

Read More »

काँग्रेस आऊट ?…जयंत पाटलांचे शिवसेनेबरोबरील युतीचे स्पष्ट संकेत ... तर महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसते

मुंबई: प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्या तिघांनी एकत्रित राहावं याला सर्वांनीच प्राधान्य द्यावे. त्यातूनच एखाद्या पक्षाला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्रित राहतील त्यादृष्टीने ‘सामना’ ने मत व्यक्त केले आहे. मात्र महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसते असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि …

Read More »

नवजात बाळांमधील दिव्यांगता शोधणारे अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटर सुरू करणार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी नवजात बाळांमधील दिव्यांगता शोधून लवकर त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे देशभर अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटर सुरू करण्यात येतील अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. आज बांद्रा येथील अलीयावर जंग इन्स्टिट्यूट येथे व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे केंद्रीय सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते …

Read More »

खा. उदयनराजे भोसले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र केल्या या ६ मागण्या मराठा समाजाला मदत करण्याची विनंती

सातारा: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सध्या न्यायालयात असून याप्रश्नी ठोस निर्णय लागेपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपुर्ती करावी, सारथी या संस्थेसाठी १ हजार कोटी रूपयांची तरतूद करावी यासह वसतीगृह शुल्काची रक्कम अदा करावी या प्रमुख मागणीसह राज्य सरकारसेवेसाठी निवड होवून ही त्यांना अद्याप सेवेत घेतले नसल्याने अशा …

Read More »

फळबाग विमाचा पुढील २ वर्षाचा करार रद्द २०१९ च्या निकषाप्रमाणे नवीन निविदा काढाव्यात-डॉ. अनिल बोंडे यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे सरकारनी हवामानावर आधारित फळबाग विमा योजनाचे हवामानाचे निकष बदलवुन विमा कंपन्या सोबत २०२० ते २०२२ पर्यंत ३ वर्षाचा करार केला होता. या कराराने शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही फक्त कंपन्या मालामाल झाल्या. भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटविल्यानंतर शेवटी शासनाने माघार घेतली. आणि …

Read More »