Breaking News

Editor

दाखला नसला तरी प्रवेश द्या अन्यथा शाळा, मुख्याध्यापकाविरोधात कडक कारवाई राज्य सरकारचे सर्व खाजगी, अनुदानितसह सर्व शाळांना आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शाळांमधील गळतीचे प्रमाण रोखण्याच्या अनुषंगाने केवळ शाळा सोडल्याचा दाखला नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश नाकारल्यास संबधित शाळेच्या विरोधात, मुख्याध्यापकाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्य सरकारने सर्व खाजगी, अनुदानित, महानगरपालिका, नगरपालिका शाळांना आज एका शासन निर्णयान्वये दिले. एखाद्या ९ वी किंवा १० वीतील विद्यार्थ्याने …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, …तर महिना-दोन महिन्यात ३ऱ्या लाटेला सामोरे जावू तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा करा

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंदर्भात टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेतच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी …

Read More »

राम मंदिरप्रकरणी फटकार मोर्चा भाजपाचा मात्र फटके दिले शिवसेनेने शिवसेनाभवनासमोर भाजपा-शिवसैनिकात राडा

मुंबई: प्रतिनिधी अयोध्येतील राम मंदीर जमिन खरेदीप्रकरणाची चौकशी मागणी केल्याच्या निषेधार्थ भाजपाने शिवसेनेच्या विरोधात आज फटकार मोर्चा काढला. मात्र शिवसैनिकांनीच भाजपा कार्यकर्त्यांना फटके लगावल्याचे दृष्य आज शिवसेना भवन परिसरात पहायला मिळाले. दरम्यान शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्त्ये आमने सामने आल्याने राडा होण्यास सुरुवात झाल्याने अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत कार्यकर्त्यांना पांगवत …

Read More »

शिक्षणाची ऑनलाईन शाळा झाली सुरु, पहिले पंधरा दिवस होणार उजळणी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शाळा दरवर्षी सर्वसाधारणपणे १५ जूनला तर विदर्भात २६ जून पासून शाळा सुरु होतात. त्या प्रमाणे राज्यातील काही शाळांची ऑनलाईन सुरुवात झाली असून सर्व विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांसाठी पहिले पंधरा दिवस आणि पुढील एक महिन्यात मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी …

Read More »

आशा सेविकांचे आंदोलन चिघळणार, आरोग्य मंत्र्यांबरोबरची चर्चा निष्फळ शासनाने कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने बेमुदत आंदोलन सुरु ठेवण्याचा कृती समितीचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आशा सेविकांच्या विविध मागण्यांसाठी कालपासून राज्य सरकारच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरु करण्यात आले. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी गटप्रवर्तक कृती समिती आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात आज सकाळी बैठक झाली. परंतु बैठकीत सर्वमान्य तोडगा न निघाल्याने आशा सेविकांचे आंदोलन चिघळणार असल्याची शक्यता आहे. आशा सेविकांनी आंदोलन …

Read More »

कैकाडी समाजाचा SC मध्ये समावेशासाठी केंद्राकडे पुन्हा शिफारस करणार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून विदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून अनुसुचित जातीत …

Read More »

आशा सेविकांच्या जीवनाशी राज्य सरकार का खेळते आहे ? भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्या जीवाची पर्वा न करता योगदान देणाऱ्या ‘आशा’ सेविकांच्या जीवनाशी न खेळता  सरकारने या कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य प्रवक्ते केशव …

Read More »

पुरूषोत्तम रामाच्या नावाने चंदा, हाच संघ परिवार व भाजपाचा धंदा दोन कोटींची जमीन काही मिनिटात १८.५ कोटींची कशी झाली ? सचिन सावंताचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणासाठी जमीन संपादनाच्या कामात घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. दोन कोटी रुपयाची जमीन अवघ्या काही मिनिटातच १८.५ कोटी रुपयांना विकत घेऊन मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या नावावर सर्व मर्यादा सोडून लज्जाहिनतेने भाविकांच्या श्रद्धेशी चालवलेला हा खेळ आहे. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रामाच्या नावावर लोकांच्या …

Read More »

उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश शुल्क समितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा आ. भातखळकर यांच्या जनहित याचिकेवर आदेश

मुंबई: प्रतिनिधी कोरोना काळात फी वाढ व सक्तीची फी वसुली करण्यास मनाई असताना सुद्धा अनेक शाळांनी अवाजवी फी वाढ करत सक्तीची फी वसुली चालवली आहे, तसेच वेळेत फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू न देण्याचा प्रकार अनेक शाळांनी चालविला. याविरोधात भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे अतुल भातखळकर यांनी दाखल …

Read More »

महाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती

मुंबई: प्रतिनिधी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ रिक्त जागांसाठी महाविकास आघाडीने पाठविलेल्या १२ जणांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेच असल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातंर्गत झालेल्या सुणावनी दरम्यान पुढे आली. गतसरकारने नियुक्त केलेल्या राज्यपाल नियुक्त १२ जागांवरील विधान परिषद सदस्यांची मुदत पूर्ण झाली. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी महाविकास …

Read More »