Breaking News

Editor

मोदी सरकारने डाटा न दिल्याने ओबीसींवर ही वेळ ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी भाजपचे राज्य सरकार असतानाच केंद्राने त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली. पाच वर्ष हातात असताना ओबीसींचे प्रश्न का सोडवले नाही असा सवाल करतानाच भाजपला खरी काळजी असेल तर त्यांनी केंद्राकडून इंपेरिकल डाटा घ्यावा. जनतेला सुद्धा माहित आहे, कोणी कोणाच्या घरी जाऊन आता डाटा गोळा करू शकत नाही. डाटा ताबडतोब …

Read More »

अखेर आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रयत्नाला यश नगरविकास मंत्र्यांनी दिले आदेश

मुंबई : प्रतिनिधी पुणे शहरातील आंबिल ओढा झोपडपट्टी भागातील घरे पाडण्याची अचानक कारवाई अचानक आज सकाळपासून सुरु करण्यात आली. त्यामुळे स्थानिक रहिवाशी आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. याप्रश्नी अखेर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तातडीने बैठक घ्यायला लावून …

Read More »

भाजपा कार्यकारणीने केली अजित पवार, अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी मराठा, पद्दोनतीतील आरक्षण प्रश्नीही ठराव

मुंबई : प्रतिनिधी सचिन वाजे यांच्या पत्रातील उल्लेखाच्या आधारे ठाकरे सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करा, अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत गुरुवारी करण्यात आली. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे मराठा आरक्षणा पाठोपाठ ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गमाविण्याची वेळ आली आहे. ओबीसी समाजाला आरक्षण …

Read More »

ओबीसी आरक्षण फडणवीसांनी वाचविले तर आघाडीने घालविले राज्य सरकार विरोधात २६ ला राज्यव्यापी आंदोलन - पंकजा मुंडे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी नाकर्त्या राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले असते, तर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गमाविण्याची वेळच आली नसती. फडणवीस सरकारने तातडीने हालचाली केल्यामुळेच त्यावेळी हे आरक्षण वाचले. मात्र त्या नंतर आघाडी सरकारने आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही वेळेत पूर्ण केली नाही. आघाडी सरकारमधील मंत्री आरक्षणाच्या मुद्द्याचा निकाल लागेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ …

Read More »

तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करू नका ऑक्सिजन,आयसीयू बेड्स ,फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन करून देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश

मुंबई : प्रतिनिधी दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे, डेल्टा प्लेस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे, हे सगळे लक्षात ठेवून संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील तसेच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या …

Read More »

जयंत पाटील ११ दिवसात फिरणार ८ जिल्हे आणि ४६ विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याला आजपासून मराठवाड्यातून सुरुवात

उस्मानाबाद-तुळजापूर: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्‍या टप्प्यातील परिवार संवाद दौर्‍याला मराठवाड्यातून आजपासून सुरुवात झाली असून तुळजाभवानी आईचे दर्शन महाद्वारात उभे राहून घेत राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याला प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रारंभ केला. परिवार संवाद दौर्‍याचा पहिला टप्पा विदर्भातून सुरु झाला होता.त्यानंतर कोरोनाचे संकट आल्याने यापुढील दुसरा टप्प्यातील दौरा स्थगित …

Read More »

मुंडे यांचा मोठा निर्णय :१० वी परीक्षेत ९० टक्के गुण प्राप्त केलेल्या SC विद्यार्थ्यांना २ लाख आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना होणार लाभ

मुंबई: प्रतिनिधी SC अर्थात अनुसूचित जातीतील १० वीच्या परीक्षेत ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ११ वी व १२ वी या दोन वर्षात प्रत्येकी १ लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत …

Read More »

राज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अनाथांना स्वतंत्र शिधापत्रिका मिळावी अशी मागणी अनेक वर्ष केली जात होती. याबाबत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरण करण्याबाबतचा निर्णय प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत घेतला आहे. राज्यातील २८ वर्षापर्यंतच्या अनाथांना बीपीएल शिधापत्रिकेबरोबर त्याचे …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कंपनीच्या मालकी हक्कात बदल करण्यास मान्यता

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील सहार आणि छ.शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा जीव्हीके कंपनीने अदानी एअरपोर्टला हस्तांतरीत केल्यानंतर आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची ५० टक्के मालकीही आता अदानी समुहाकडे हस्तांतरीत करण्यात आली असून मालकी हक्क बदलास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सदरच्या मालकी बदलास केंद्रातील मोदी सरकारने यापूर्वीच मंजूरी दिल्याने …

Read More »

करदाते आणि जीएसटी भरणाऱ्यांचे वाद आता होणार कमी महाराष्ट्र वस्तु व सेवाकर (सुधारणा) विधेयक २०२१ च्या प्रारुपास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई: प्रतिनिधी करदाते व वस्तु आणि सेवा कर विभाग यांच्यामध्ये भविष्यात उद्भवणारे वाद कमी होऊन कार्यपद्धती अधिक सुलभ करण्याच्या तसेच करदात्याचे हित जोपासण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र वस्तु व सेवा कर (सुधारणा) विधेयक २०२१ च्या प्रारुपास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यामध्ये संपूर्ण कर दायित्वाऐवजी निव्वळ …

Read More »