Breaking News

Editor

जयंत पाटील म्हणाले, त्यांचा कारभार फक्त एक वर्षाचा…

महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात अभूतपूर्व काम केले, ज्याची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली. कर्जमाफी देण्याचा निर्णय आम्ही सर्वप्रथम घेतला, कोविडच्या काळात देशभरात कौतुक होईल इतके काम केले. मात्र कपटाने सरकार पाडण्यात आले अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथे केली. कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भुदरगड, …

Read More »

भाजपा मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी, नाना तुम्ही मशालीची चिंता करा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठी मंत्रिपद सोडून उठाव केला. त्यांच्या पक्षासोबत भारतीय जनता पार्टीची युती असून भाजपा शिंदे यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची काळजी करण्यापेक्षा मशालीची आणि पंजाची चिंता करावी, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी बुधवारी लगावला. ते गोंदिया येथे पत्रकार परिषदेत …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, शिवसेनेतील बंडाळी ही भाजपाप्रणितच…

हिंदूत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही या भीतीने भाजपाला ग्रासले असल्यामुळे शिवसेना फोडण्याचे पाप भाजपाने केले अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना आज केली. शिवसेनेतील बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती ती भाजपाप्रणितच होती असा जोरदार हल्लाबोलही त्यांनी केला. …

Read More »

संजय राऊत यांचे आईला भावनिक पत्र, महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही

पत्रावाला चाळ पुर्नवसन प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीच्या तुरुंगात असलेले शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज आपल्या आईला भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रात आपण महाराष्ट्राच्या दुश्मनांसमोर झुकू शकत नाही असे सांगत जशी तु माझी आई आहेस तशी शिवसेना सगळ्यांची आई आहे. आईशी बेईमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता अशी भावनिक साद …

Read More »

राज्यात होणार एलएनजी गॅसपासून वीजनिर्मिती

राज्याची वाढती विजेची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने आज किंग्ज् गॅस कंपनीसोबत राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार केला. या करारामुळे राज्याला स्वच्छ आणि सुरक्षित ऊर्जानिर्मितीसाठी मदत होणार आहे. याबाबतचा पायलट प्रकल्प उरण प्रकल्पात राबविला जाणार आहे. लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) हे ऊर्जा निर्मिती क्षेत्रात स्वच्छ …

Read More »

मीरा-भाईंदर शहराला मॉडेल शहर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू

मुंबई व ठाणे लगतचे शहर असलेले मीरा-भाईंदर हे शहर सर्व सोयीसुविधा युक्त मॉडेल शहर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. राज्य शासन यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मिरा रोड (पूर्व ) महाजनवाडी येथे स्केटींग रिंगचे लोकार्पण, महापालिकेच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमीपूजन, भाईंदर (प.) येथील चिमाजी …

Read More »

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून तर्क-वितर्काला उधान

अंधेरी विधानसभेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच निवड प्रक्रिया जाहिर केली. त्यातच शिवसेनेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांनी बंड करत ४० आमदारांना सोबत घेत वेगळी चुल मांडली. त्यातच रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना आपल्या गटात खेचण्यासाठी शिंदे गटाकडून …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, तुम्हालाच खुर्चीवर बसवेन पण मी नाही…

मागील काही महिन्यापासून मनसे आणि भाजपा युती करणार असल्याची चर्चा सातत्याने सुरु असून यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकला चलो रे चा नारा देत कार्यकर्त्यांनी पुढचे पाच महिने दिवस रात्र काम केले पाहिजे असे सांगत मी तुम्हाला विजयाकडे घेऊन जाणार असून विधानसभेत, लोकसभेत सत्तेत बसवेन. तसेच त्या …

Read More »

काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ तारखेला टिळक भवन येथे मतदान राज्यातील ५६५ प्रदेश प्रतिनिधी बजावणार मतदानाचा हक्क

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जेष्ठ नेते व माजी मंत्री मल्लिकार्जून खर्गे व माजी मंत्री खासदार डॉ. शशी थरूर यांच्यात लढत होत असून येत्या १७ ऑक्टोबरला मतदान होत आहे. या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पथकाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे भेट देऊन पाहणी केली. काँग्रेस …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव व मशाल हे नवीन चिन्ह धारण करण्यास मान्यता दिल्यांनंतर भाजपाने यावर टीका करीत या घडामोडींना भाजपा जबाबदार नसल्याचे सांगतानाच पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव …

Read More »