Breaking News

Editor

महाराष्ट्र निवडणूक आयोगाद्वारे भाजपाच्या सोशल मिडिया कंपनीचा वापर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कागदपत्रांसह सादर केले पुरावे

मुंबई : प्रतिनिधी २०१९ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीदरम्यान भारतीय निवडणूक आयोगाचे सोशल मीडिया वरील फेसबुक पेज हाताळणारी कंपनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याची असल्याचं समोर आलं आहे. संबंधित व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचा राष्ट्रीय संयोजक होता. निवडणूक आयोगाने निष्पक्ष संस्था म्हणून काम करणं अपेक्षित आहे. परंतु सदर प्रकार लोकशाहीमधील …

Read More »

प्रशासनात डॉक्टर सहकारी असल्याचा असाही विभागाला फायदा कर्मचाऱ्यांच्या शरीरातील अॅण्टीबॉ़डी स्टेट करून सुरक्षिततेची घेतली काळजी

मुंबई : विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेळोवेळी पावले उचलण्यात येत आहेत. या विषाणूच्या संसर्गाची लागण स्वत:लाही होवू नये यादृष्टीने अनेकजण पुरेशी काळजी घेत आहेत. तरीही या विषाणूची लागण काही जणांना होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर मंत्रालयातील उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील उपसचिव डॉ.श्रीकांत पुलकंडवार यांनी विभागातील …

Read More »

कोरोना: संख्या साडेतीन लाखाच्या जवळ तर अॅक्टीव्ह रूग्ण १.४० लाखावर ९८९५ नवे बाधित, ६४८४ जण घरी तर २९८ मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील २४ तासात ९८९५ नव्या बाधित रूग्णांचे निदान झाल्याने एकूण रूग्णांची संख्या ३ लाख ४७ हजार ५०२ वर तर बाधित रूग्णांची संख्या १ लाख ४० हजार ०९२ वर पोहोचली. याशिवाय ६४८४ जण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १ लाख ९४ हजार २५३ वर पोहोचली आहे. २९८ जणांच्या …

Read More »

सुपारी व नारळ झाडांच्या नुकसानीबद्दल मिळणार या नव्या रकमेनुसार मदत राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी  निसर्ग चक्रीवादळामुळे पुर्णत: नष्ट झालेल्या  सुपारी व नारळाच्या झाडांना   विशेष बाब म्हणून   प्रति झाडाप्रमाणे  वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. निसर्ग चक्रीवादळामुळे  रायगड व रत्नागिरी जिल्हयात नुकसान झालेल्या बहुवार्षिक पिकांपैकी  सुपारी व नारळाच्या झाडांना  प्रति हेक्टरी रू. 50,000/- या दराने मदत देण्याऐवजी  पुर्णत: …

Read More »

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांचे मंत्रिमंडळाने केले अभिनंदन राज्यात गेल्या १० वर्षातली विक्रमी कापूसाची खरेदी

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असून देखील पणन विभागाने विक्रमी २१८.७३ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली. आज या संदर्भात मंत्रिमंडळाने या कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्धल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सहकार व पणन मंत्र्यांचे अभिनंदन केले. गेल्या १० वर्षात झाली नाही अशी विक्रमी खरेदी झाल्याचे प्रधान सचिव, पणन …

Read More »

वैद्यकीय शिक्षणाच्या परीक्षांना पुन्हा ब्रेक परिस्थिती सुधारल्यावर परिक्षा घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता  अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घेण्यात  याव्यात अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना आज दिल्या. प्रथम द्वितीय तसेच …

Read More »

आंदोलनकर्त्ये, स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतला निर्णय, तो वटवृक्ष अबाधित राहणार सर्वांनुमते चारशे वर्ष पुरातन वटवृक्ष वाचविण्याचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी मौजे भोसे (जि. सांगली) येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा चारशे वर्ष पुरातन वटवृक्ष वाचविण्याचा निर्णय झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ च्या प्रकल्प संचालकांनी वटवृक्ष वाचविण्याबाबतचे पत्र सर्व संबंधितांस दिले आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री, आदित्य ठाकरे यांनी हा वटवृक्ष वाचाविण्यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री , नितीन गडकरी यांना …

Read More »

वाढदिवसाला फलक, हारतुरे नको तर निधीला देणगी द्या, रक्तदान-प्लाझ्मा दान शिबिरे घ्या वाढदिवस साजरा करणार नसल्याची मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी ‘आपण वाढदिवस साजरा करणार नसून सध्याच्या कोरोना परिस्थितीत कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये. तसेच हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी. नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत‘, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेस केले आहे. आपल्याला दिलेल्या शुभेच्छा या सर्व कोविड …

Read More »

२०० खाजगी व अफोर्डेबल अशा इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मोफत परवाना देणार लीड स्कूलची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये खाजगी व अफोर्डेबल इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.  विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी तंत्रज्ञान आणणे आणि शिक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.  कठीण काळात देखील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत राहावे यासाठी या शाळांच्या प्रयत्नांमध्ये लीड स्कूलने (LEAD School) मदतीचा हात पुढे केला आहे.  भारतातील सर्वात …

Read More »

संपूर्ण वीजबिल माफ झालेच पाहिजे भीम आर्मीची ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन अद्यापही आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. तर काहीजणांना कमी वेतनात काम करावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर वीजेचा वापर वाढणे सहाजिकच आहे. मात्र वीज वितरण विभागाकडून वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले पाठविण्यात आल्याने ही सर्वसामान्य नागरिकांना वीज बिल भरणे अवघड बनले असल्याने वीज बिलेच माफ …

Read More »