Breaking News

Editor

बालवाडी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण वेळापत्रक जाहीर केल्याची शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रसारावर अद्याप नियंत्रण मिळविण्यात म्हणावे तसे यश आलेले नसल्याने अखेर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने पूर्व प्राथमिक ते १२ पर्यतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार पूर्व प्राथमिक आणि १ ते २ रीच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज सकाळी ३० मिनिटाचे ऑनलाईन शिक्षण देण्याचे निश्चित करण्यात …

Read More »

शासकिय बदल्यांसाठी आता आणखी १० दिवसांची मुदतवाढ १० ऑगस्टपर्यत वाढविली मुदत

मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे राज्यात रखडलेल्या शासकिय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी ३१ ऑगस्टपर्यतची मुदत देण्यात आली होती. मात्र आता या बदल्यांची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी आणखी १० दिवसांची मुदतवाढ राज्य सरकारने दिली असून या कालावधीत एकूण आस्थापनेच्या फक्त १५ टक्के कर्मचाऱ्यांच्याच बदल्या करता येणार आहेत. काही दिवसांपूर्वी या रखडलेल्या बदल्यांची पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांची …

Read More »

आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भविष्यवाणी खरी ठरतेय राज्यात महिनाभरात दोन लाख बाधित वाढले

मुंबई: प्रतिनिधी साधारणत: १ महिन्यापूर्वी राज्यातील कोरोनाबाधितींची संख्या पुढील जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वाढताना दिसणार असल्याचे भाकित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यास आज बरोबर एक महिना पूर्ण होत असून या कालावधीत कोरोनाग्रस्तांची संख्या चांगलीच वाढताना दिसत असल्याने अजित पवारांचे भाकित खरे होताना दिसत आहे. २३ जून २०२० रोजी राष्ट्रवादी …

Read More »

आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी तज्ञांनो उपचाराच्या मार्गदर्शक सूचना टास्क फोर्सकडे द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी कोरोना रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी,आयुर्वेद, युनानी या क्षेत्रातील तज्ञांनी मार्गदर्शक सूचना तयार करुन टास्क फोर्सकडे द्याव्यात जेणेकरून एकात्मिक औषधोपचार देऊन रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातील विविध पॅथींचे तज्ज्ञ व वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत …

Read More »

मुंबई उपनगरातील बेरोजगारांनों या संकेतस्थळावर नावे नोंदवा कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक यांचे आ‌वाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छूक उमेदवारांना नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि मुंबई उपनगर जिल्ह्यातील आतापर्यंत नोंदणी केलेल्या बहुसंख्य उमेदवारांनी आपल्या आधार क्रमांकाची नोंद केलेली नाही. तरी अशा उमेदवारांना आपल्या नोंदणी क्रमांकास आधार क्रमांकही जोडावा लागणार आहे, अन्यथा 15 ऑगस्ट नंतर …

Read More »

कोरोना: राज्यातील रूग्ण संख्या पहिल्यांदाच १० हजारापार ५५५२ जण घरी तर २८० जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सर्वाधिक १० हजार ५७६ बाधित रूग्ण आढळून आले असून आतापर्यंतची २४ तासातील ही सर्वाधिक संख्या आहे. तर आज ५५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ८७ हजार ७६९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाबाधितांच्या सर्वाधिक संख्येमुळे बाधितांची संख्या १ लाख ३६ हजार ६०७ रुग्णांवर …

Read More »

विरोधी पक्षनेत्यांबाबत आघाडी सरकारचा तो निर्णय फडणवीसांची इच्छापूर्तीचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा टोला

मुंबई: प्रतिनिधी शासकीय अधिका-यांनी कोणत्या बैठकीला उपस्थित रहावे, याबाबत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाने फडणवीस सरकारच्याच निर्णयाची आणि इच्छेची पूर्ती केली आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना व विरोधी पक्ष नेत्यांना पोटशूळ का व्हावा? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. भारतीय जनता …

Read More »

सरकारचे आदेश ! विरोधकांच्या बैठकांना अधिकाऱ्यांनी हजर रहायचे नाही राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूवरून आता खऱ्या अर्थाने राजकारण सुरु झाले असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भाजपाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्याचा दौरा करण्यास सुरुवात केली. मात्र या दौऱ्यात सरकारकडून राहीलेली माहिती या विरोधी पक्षनेत्यांकडून उघडकीस येत असल्याने अखेर या …

Read More »

कोरोना: राज्यात सर्वाधिक अॅक्टीव्ह रूग्ण आता पुण्यात, ७१८८ जण घरी ८३६९ नवे बाधित रूग्ण तर २४६ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज ७१८८ जण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १ लाख ८२ हजारावर पोहोचली आहे. ८३६९ नवे बाधित रूग्ण आढळून आले असून या रूग्ण संख्येत सर्वाधिक २७२९ इतके रूग्ण पुण्यात आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यातील एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ४१ हजार ५३४ वर पोहोचली आहे. …

Read More »

कमी चाचण्यांमुळेच संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण अधिक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी कमी चाचण्यांमुळेच सातत्याने कोरोना संसर्ग वाढत असून, मृत्यूचे प्रमाण सुद्धा अधिक असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोरोना चाचण्या, त्यातून येणारे पॉझिटिव्ह रूग्ण, दैनंदिन संसर्गाचे आणि मृत्यूचे प्रमाण याचा मुंबई आणि महाराष्ट्राचा आलेख त्यांनी मांडला आहे. दिल्लीत केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर आणि तेथे मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्यानंतर तेथे …

Read More »