Breaking News

Editor

कोरोना: मुंबईतील रूग्ण दुप्पटीचा वेग ६७ दिवसावर ९४३१ नवे रूग्ण, ६०४४ बरे, २६७ जणांच्या मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सर्वाधिक रूग्णसंख्येच्याबाधीत सर्वात अधिक असलेल्या मुंबई शहरातील कोरोना रूग्णवाढीचा दर आता १ टक्क्यावर आला आहे. तर रूग्ण दुपटीचा वेग ६७ दिवसांवर पोहोचला आहे. त्यामु‌ळे शहरात कोरोना विषाणूवर चांगल्यापैकी नियंत्रण मिळविण्यात मुंबई महापालिकेला यश मिळाल्याचे दिसून येत असून मागील २४ तासात १११५ रूग्ण आढळून आले आहेत. तर ५७ …

Read More »

महास्वयंम आणि ऑनलाईन मेळाव्यातून १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार १ लाख ७२ हजार बेरोजगारांची नोंदणी : कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीचीही समस्या निर्माण झाली. पण असे असतानाही मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयंम वेबपोर्टलमार्फत तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला. मागील ३ महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठांवर १ लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी रोजगारासाठी …

Read More »

उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका, लॉकडाऊन वाढवू नका अॅड. प्रकाश आंबेडकर यांची मागणी

पुणे: प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपण कोरोनामुळे होणारा मृत्यू दर आटोक्यात आणू, असे म्हटले आहे. त्यावर उद्धवजी तुम्ही खुदा बनू नका,अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली असून ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे,भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे त्यांना जास्त काही होणार नाही. ते कोरोनाने …

Read More »

दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी महायुतीतर्फे १ ऑगस्टला आंदोलन भाजपाचे सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न केल्याने भाजपा, रयत क्रांती,  रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) रासप आणि शिवसंग्राम महायुतीतर्फे १ ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. महायुतीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी दिली. या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विधानसभेतील विरोधी पक्ष …

Read More »

फडणवीस म्हणाले मुख्यमंत्र्यांना, आर्थिक संकटातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे लक्ष द्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले पत्र

मुंबई: प्रतिनिधी राज्य महामार्ग परिवहन सेवेतील (एसटी) कर्मचार्‍यांची सध्या परवड सुरू आहे. हे सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना मार्च महिन्याचे २५ टक्के वेतन अजून मिळालेले नाही, मे महिन्याचे ५० टक्के वेतन अजून मिळालेले नाही, तर जून महिन्याचे १०० टक्के वेतन अजून मिळालेले …

Read More »

कोरोना: ७२२७ सह राज्यात २ लाखाहून अधिकजण घरी : मुंबईत ६ हजारावर मृत्यू ९२९१ नवे बाधित रूग्णांचे निदान तर २५८ जणांच्या मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज ७२२७ जण बरे होवून घरी गेल्याने बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या २ लाख ७ हजार ११९ वप पोहोचली आहे. ९२९१ इतक्या नव्या रूग्णांचे निदान झाल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ३६८ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ४८१ वर पोहोचली असून …

Read More »

औषध मंत्री म्हणाले, रेमडेसीवर आणि टोसीलीझुमॅब ही औषधे कधी वापरायची ते सांगा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे  प्रामुख्याने रेमडेसीवर [Remdesivir 100 mg Inj] व टोसीलीझुमॅब  (Tocilizumab Inj) या औषधाच्या वापराबद्दल संभ्रम निर्माण होत असून या औषधांच्या वापराबाबत कोवीड टास्कफोर्सच्या माध्यमातून निश्चित असे मार्गदर्शन होणे आवश्यक असून त्याबाबतचे मार्गदर्शन करावी अशी विनंती अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नुकतेच पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री …

Read More »

ई सिम धारकांनो सायबर भामट्यांपासून सावध रहा महाराष्ट्र सायबर विभागाचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी ई  सिम धारकांनी सायबर भामट्यांपासून सावध राहावे. त्यांच्या फसव्या फोनला बळी पडू नये.  या साठी काळजी घ्यावी,असे आवाहन महाराष्ट्र सायबर तर्फे  करण्यात येत आहे. सध्या बाजारात नवीन प्रकारचे फोन आले आहेत त्यामध्येच e -सिम किंवा embedded सिमकार्ड असते . हे e -सिमवाले फोन जर तुमच्याकडे असतील तर …

Read More »

मंत्री, सदस्य यांना शपथ घेण्याबाबत ‘मार्गदर्शक तत्वे’ ठरवून द्या राज्यपाल कोश्यारींचे उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्षांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी नव्याने निवडून आलेले काही संसद सदस्य तसेच विधानमंडळ सदस्य शपथ घेताना निर्धारित प्रारुपातील शपथ न घेता, त्यामध्ये आपल्या पक्षाचे नेते- तसेच आराध्य व्यक्तींची नावे जोडून शपथ घेत असल्याचे नमूद करून या संदर्भात सर्व संबंधितांकरिता निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे / आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी …

Read More »

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात इतर मागासवर्गीयांवर अन्याय योजनेत बदल करण्याची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती या योजनेच्या धर्तीवर राज्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत इतरमागास प्रवर्गाचा समावेश सर्वसाधारण प्रवर्गात केला गेला. त्यामुळे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील युवक- युवतींवर अन्याय होत असून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात इतर मागासवर्गीय प्रवर्गास डावलण्यात आल्यामुळे योजनेत बदल करण्याची …

Read More »