Breaking News

Editor

खुषखबर : लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे राहिलेले थकित वेतन मिळणार जुलै महिन्याचे वेतन अदा झाल्यानंतर मार्चचे अर्धे वेतन जमा होणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील निवडूण आलेले लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्यातील अर्धे राहिलेले वेतन लवकरच मिळणार आहे. सध्या जुलै महिन्याचे वेतन तयार करण्याचे काम सुरु आहे. ते वेतन कोषागारातून दिले गेल्यानंतर लगेच मार्च महिन्याचे थकित अर्धेवेतन त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश वित्त विभागाने सर्व विभागांना दिले असून याबाबतचा …

Read More »

या ठिकाणीचे माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांना मिळणार ५० लाखाचे संरक्षण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर अत्यावश्यक घटकांमध्ये समावेश

मुंबई : प्रतिनिधी कामगार विभागांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षारक्षक व माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून करण्याचे व ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही ५० लाख रुपयांचे विमा संरक्षक कवच मंजूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज …

Read More »

१० वीचा निकाल उद्या या संकेतस्थळावर पाह्यला मिळणार शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील १० वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल मुंबई, पुणे, अमरावती, कोल्हापूर, नागपूर यासह राज्यातील सर्वच बोर्डांचा निकाल एकाचवेळी जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. जून महिन्याच्या अखेरीस मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १२ वीचा …

Read More »

फडणवीसांना त्यावेळी वेदना झाल्या नव्हत्या का? सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या प्रश्नी राज्य सरकारने मेगाभरतीची प्रक्रिया थांबविल्याचे राज्य सरकारने सांगितल्याचे ऐकून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वेदना झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र डिसेंबर २०१८ रोजी ते स्वत: मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वत:च मेगा भरती थांबवित असल्याचे प्रतिज्ञा पत्र मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या याचिकेवर प्रतिवाद करताना …

Read More »

मंत्री चव्हाण म्हणाले, कोरोनामुळे ऐजबार होणाऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल काँग्रेस नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे मत

मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे राज्यातील मेघा नोकरभरती स्थगित करण्यात आलेली आहे. मात्र या कालावधीत ऐजबार अर्थात वयोमर्यादा उलटून गेलेल्या तरूण-तरूणींनाचा विचार करण्याची गरज असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे. तरीही हा विषय राज्याच्या मंत्रिमंडळात आल्यानंतर त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे असल्याची भूमिका राज्यातील काँग्रेस नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी …

Read More »

गृहनिर्माणशी फटकून वागणाऱ्या अधिकाऱ्याची त्याच विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती पाच महत्वाच्या सनदी अधिका-यांच्या बदल्या

मुंबई : प्रतिनिधी शहरातील महत्वाच्या धारावी पुर्नवसन प्रकल्पाचे काम मार्गी लागावे यासाठी थेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क ठेवत फाईल प्रक्रियेतून गृहनिर्माण विभागाला वगळणारे सनदी अधिकारी ई.व्ही. श्रीनिवास यांची नियुक्ती गृहनिर्माण विभागाचे पूर्णवेळ सचिव म्हणून गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्या आग्रहामुळे राज्य सरकारने आज नियुक्ती केली. विशेष म्हणजे …

Read More »

कोरोना दिलासा : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होवून घरी जाणाऱे जास्त नवे बाधित रूग्ण ७९२४, बरे झालेले ८७०६ तर मृतकांची संख्या २२७

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील दोन महिन्यात पहिल्यांदाच कोरोबाधित रूग्णांच्या संख्येपेक्षा जास्त बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या जास्त ठरली आहे. मागील २४ तासात ७९२४ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर ८७०६ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या २ लाख २१ हजार ९४४ वर पोहोचली आहे. …

Read More »

भाजपाच्या ‘रक्षक बंधन’ उपक्रमाचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ 'एक घर दोन राख्या' चे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष मुंबई आयोजित “रक्षक बंधन” या उपक्रमाचा आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना हेदेखील उपस्थित होते. “रक्षक बंधन” कार्यक्रमांतर्गत कोविड योद्धे डॉक्टर्स, वैद्यकीय …

Read More »

तीन जम्बो रुग्णालये तातडीने उभारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

पुणे : प्रतिनिधी पुणे जिल्हयातील ‘कोरोना’ बाधित संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेवून तातडीने तीन ठिकाणी जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, …

Read More »

मराठा आरक्षणाची सुनावणी आता ऑनलाईन नव्हे तर प्रत्यक्ष होण्याची शक्यता आजची सुनावणी समाधानकारक पण पुढील सुनावणी २५ ऑगस्टला : अशोक चव्हाण

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या ऑनलाईन सुनावणीवेळी पुरावे आणि इतर कागदपत्रे सादर करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सुनावणी ऑनलाईन घेण्याऐवजी ती प्रत्यक्षात घ्यावी, हे प्रकरण सैविधानिक खंडपीठाकडे पाठविण्याची मागणी राज्य सरकारने सर्वेाच्च न्यायालयाकडे केली. यावर आता ऑनलाईन पध्दतीऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याबाबत न्यायालयाने विचार करणार असल्याचे स्पष्ट करत पुढील …

Read More »