Breaking News

Editor

भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाणे: प्रतिनिधी भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी ही तीन मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळून १० जण मृत्युमुखी पडले, तर किमान ३० ते ३५ जण …

Read More »

मराठा आरक्षण वाचवा: ठिकठिकाणी आंदोलन आमदार आणि खासदाराच्या घरासमोर निदर्शने

मुंबई: प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीकरीता राज्यात विविध जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. पुणे, नाशिक, मराठवाड्यातील औरंगाबादेत, सोलापूरसह अनेक ठिकाणी मराठा समाजाच्यवतीने आंदोलने करण्यात आले. यावेळी मराठा समाजाकडून बहुतांश लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलने करण्यात आली. त्यामुळे अनेक आमदार, खासदारांना घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले. सोलापूरात खासदार डॉ.जयसिध्देश्वर यांच्या मठासमोर …

Read More »

पोलिस यंत्रणेला चकमा देत मनसे कार्यकर्त्यांचा लोकलने प्रवास ठिकठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलन

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरावासियांची जीवन वाहिनी असलेल्या लोकलने प्रवास करण्यास सर्वांना प्रवास करण्यास राज्य सरकारने बंदी आणली असून फक्त सरकारने परवानगी दिलेल्यांनाच प्रवास करण्याची मुभा दिली. मात्र मुंबईसह उपनगरातील नागरीकांना दैनदिन कामासाठी एक तर एस.टी अथवा खाजगी बसने प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत …

Read More »

कोरोना : १२ लाखावर रूग्ण; एमएमआर-पुणे, नागपूरात लक्षणीय वाढ; सर्वाधिक रूग्ण घरी २० हजार ५९८ नवे बाधित, २६ हजार ४०८ बरे झाले तर ४५५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला रूग्णवाढ होताना दिसत असली तर बरे होण्याच्या दरात पुन्हा वाढ झालेली असून सद्यपरिस्थितीत बरे होण्याचा दर ७३.१७ टक्केवर पोहोचला आहे. तर रूग्ण आढळून येण्याचा दर २०.५८ टक्क्यावर आहे. आज मुंबई महानगर प्रदेशात ५ हजार २०९ इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर पुणे मंडळात ५ हजार …

Read More »

उद्धवजी, आतातरी जनतेची दिशाभूल करणं सोडा ! भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्याना टोला

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने एका खाजगी संस्थेला स्वतःच्या जनसंपर्कासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी काही दिवसांपूर्वी सुमारे ६,००,००,०००  रुपयांचे टेंडर काढले. राज्य सरकारला असे वाटत आहे की जनतेचा त्यांच्याविषयी असलेला दृष्टिकोन बदलण्यात त्या संस्थेने मदत करावी. म्हणजे सरळ सरळ जनतेची दिशाभूल करून त्यांना चुकीच्या दिशेने नेण्यास परावृत्त करावे …

Read More »

आंबेडकर म्हणतात अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा, देशमख म्हणाले ते वाक्य चुकीचे तोंडी पोलिस अधिकाऱ्यांकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यानी केल्याचे वृत्त एका वृतपत्रात प्रसिध्द झाले. मात्र ते वाक्य माझ्या तोंडी चुकीचे पध्दतीने टाकल्याचा खुलासा एका प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात आला. तर दुसऱ्याबाजूला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी त्या द्रोह करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे जाहीर …

Read More »

महाविकास आघाडीविरोधात भाजपाची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणत असल्याची भाजपाचे विनय सहस्त्रबुध्दे यांच्यासह तीन खासदांराचे पत्र

मुंबई : विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून डिसेंबर २०१९ पासून नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि प्रसारमाध्यमांच्या फ्रिडम् ऑफ स्पीच या संकल्पनेवर गदा आणली जात आहे. तसेच राज्यात राज्य सरकार पुरस्कृत गुंडागर्दी सुरु असल्याचा मुद्दा उपस्थित करत मानवी हक्क आयोगाने यासंदर्भात लक्ष घालावे अशी मागणी भाजपा नेते तथा खासदार विनय सहस्त्रबुध्दे, …

Read More »

कोरोना : सलग २ ऱ्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणारे जास्त : मृतक ही ४०० पार २१ हजार ९०७ नवे बाधित रूग्ण, २३ हजार ५०१ बरे झाले तर ४२५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सलग २ ऱ्या दिवशी बाधित रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या जास्त आहे. आज २१ हजार ९०७ बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण रूग्ण संख्या ११ लाख ८८ हजार ०१५ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३ लाखापेक्षा कमी होवून २ लाख ९७ हजार ४८० वर पोहोचली. तर २३ हजार …

Read More »

वायकरांच्या मागणीला यश: वधावन आणि एचडीआयएलच्या मालमत्तेची विक्री गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्र लिहून कळविली वायकरांना माहिती

मुंबई: प्रतिनिधी बहुचर्चित पंजाब अँड महाराष्ट्र बँके अर्थात पीएमसीतील आर्थिक घोटाळ्यातील रकमेची वसूली करण्यासाठी राकेश वधावान, सारंग वधावान आणि एचडीआयएलची मालमत्ता विकून वसुली करण्यात येणार आहे. त्यासाठी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची लवकरच जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील यांनी एका पत्राद्वारे आमदार रविंद्र वायकर यांना …

Read More »

खुशखबर : या पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने मुंबईत होणार ३ हजार ४०१ पदांची भरती महास्वयंम संकेतस्थळावरुन सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने १८ ते २३ सप्टेंबरदरम्यान ऑनलाईन पध्दतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ रोजगार मेळावा घेण्यात येत असून या मेळाव्यात ३ हजार ४०१ पदांसाठी संधी उपलब्ध झाली आहे. उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी व लॉग इन करुन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या …

Read More »