Breaking News

कौशल्य विकासच्या ३० दिव्यांग विद्यार्थ्यांकडून मंत्रालयात हेअर आणि फूट मसाजचे प्रात्यक्षिक कौशल्य विकास व उद्योग विभागातंर्गत प्रोत्साहनपर विशेष उपक्रम

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील दिव्यांगासह इतर बेरोजगारांसाठी महत्वाच्या ठरलेल्या कौशल्य विकास व उद्योग विभागाकडून आता थेट विद्यार्थ्यांनाच प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या विभागाकडून मंत्रालयातील प्रागंणात हेअर मसाज आणि फूट मसाजचे प्रात्यक्षिक ठेवले असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योग विभागाचे उपसचिव मांडवे यांनी दिले.
या दिव्यांग तरूणांना त्यांच्या आगामी व्यवसायिक जीवनात यश मिळावे यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असून या प्रात्यक्षिकाचे आयोजन बुधवारी २३ ऑक्टोंबर २०१९ रोजी मंत्रालयातील त्रिमुर्तीसमोरील प्रांगणात सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६ पर्यंत होणार आहे. तसेच या प्रात्यक्षिकतेमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यातील नवतरूण आणि बेरोजगार तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध निर्माण करता याव्यात यासाठी कौशल्य विकास व उद्योग विभागाची स्थापना करण्यात आली. याविभागातंर्गत राज्याच्या विविध भागात खासगी आणि शासकिय मिळून ११६५ कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या केंद्रामधून एक वर्ष आणि दोनवर्षाचा डिप्लोमा आणि कोर्सही करण्याची सुविधा उपलब्ध आहे. १० वी नंतर दोन वर्षाचा कोर्स करता येणार असून या कोर्सला १२ वीशी समकक्षचा दर्जा देण्यात आला आहे. वर्षाकाठी ३६ हजार विद्यार्थी या केंद्रातून दरवर्षी परिक्षेला बसत असून यापैकी २४ हजार ८३८ विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण असून जवळपास ६९ टक्के निकालाचे प्रमाण असल्याचे त्यांनी केले.
या सर्व अभ्यासक्रमासाठी परिक्षा घेण्यासाठी राज्य सरकारकडून स्वतंत्र अशा महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळाची स्थापना करण्यात आली असून त्यांच्या अखत्यारीतच या परिक्षा घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कौशल्य विकास हा कोर्स केलेल्या व्यक्तीला शासकिय नोकरीत किंवा व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होताना प्राधान्य मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *