Breaking News

माजी मंत्री बडोले यांचा द रोल मॉडल ऑफ गुड डीड्स पुरस्काराने सन्मान थायलंड येथील बुद्धिस्ट विद्यापीठाने केला गौरव

मुंबई: प्रतिनिधी
थायलंड येथील महचुला बुद्धिस्ट विद्यापीठाच्या एमसीयुने राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री व विद्यमान आमदार राजकुमारजी बड़ोले यांचा २९ ऑगस्ट २०१९ रोजी द रोल मॉडल ऑफ गुड डीड्स हा पुरस्कार देऊन गौरव केला. बैंकॉक येथे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत राजकुमार बड़ोले यांनी दलित, शोषित, पीड़ित, मागस्वर्गीय आणि इतर समाजाच्या कल्याणासाठी भरीव कार्य केले. भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सच्चा अनुयायी या नात्याने महाराष्ट्रात त्यांनी बुद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी वेळोवेळी ऐतिहासिक भूमिका घेतली.
आमदार बड़ोले यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती राज्यात वर्षभर साजरी केली. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध जयंतीचा कार्यक्रम ‘भूतो न भविष्यतो’ अशा थाटात मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे दिमाखदार सोहळ्याद्वारे साजरा केला .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या मुकनायक पत्रिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन देशाच्या राजधानी दिल्ली येथे मुकनायक पुरस्कार घेण्याचे धाडस आमदार राजकुमार बड़ोले यांनी केले. तसेच त्यांच्या कार्यकाळात लंडन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घरात विद्यार्थी दशेत वास्तव्य केले ते घर महाराष्ट्र सरकारने विकत घेऊन त्याचे आंतरराष्ट्रीय स्मारकात रूपांतर केले यात राजकुमारजी बड़ोले यांचा सिंहाच्या वाटा होता.
पाली त्रिपिटकाचे मराठी भाषांतर करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातुन पुणे विद्यापीठाला रुपये ५ कोटी देण्याचे धाडस त्यांनी केले.

Check Also

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *