Breaking News

विनायक राऊत म्हणाले, पिकनिकमुळे अनेकवेळा आले आणि… फारशी दखल घ्यावी असं वाटत नाही

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ६ मे रोजी कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते रत्नागिरीत जाहीर सभा घेणार असल्याची माहिती नितीन सरदेसाई यांनी दिली आहे. कोकणातील विविध समस्यांवर ही सभा होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणात संघटन वाढवण्याकरिता मनसेकडून हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली.

यावेळी बोलताना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत म्हणाले की, फार काही किंमत आम्ही देत नाही. येतील आणि जातील. पिकनिकमुळे अनेकवेळा आले आणि अनेकवेळा यावं. आमचं त्याबाबत काही आक्षेप नाही. फार त्याची काही दखल घ्यावी असंही मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते एका वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.

डिसेंबर महिन्यात राज ठाकरेंनी कोकण दौरा केला होता. यावेळी कोकणातील विविध मतदारसंघात जाऊन त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. यानंतर, आता पुन्हा ६ मे रोजी ते रत्नागिरीत जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या दौऱ्याविषयी जाहीर करण्यात आले होते. परंतु, सभा नेमकी कोणत्या मैदानात घ्यायची हे ठरत नव्हते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जवाहर मैदानावर ही सभा होणार होती. मात्र, शैक्षणिक संस्था असल्याने ही जागा राजकीय सभेसाठी देणार नसल्याची भूमिका संस्थेने घेतल्याने मनसेने आता कै.प्रमोद महाजन क्रीडा संकूल हे ठिकाण निश्चित केले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या ६ व्या टप्प्यात ५९ टक्के मतदान केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली माहिती

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठी आज ५८ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी सहाव्या टप्प्यात मतदान घेतले.  लोकसभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *