Breaking News

मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी: पोलिसांकडून एकास अटक पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

साधारणत: वर्षभरापूर्वी प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली जीप ठेवण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. त्यावेळी मुंबई पोलिस यंत्रणेच्या सतर्कतेवरून मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर आता थेट उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे प्रकरण पुढे आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अंबानीचे निवासस्थान असलेल्या अँटिलिया या निवासस्थानाभोवती बंदोबस्तात वाढ केली. दरम्यान एका व्यक्तीस अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयातील दूरध्वनीवर सोमवारी सकाळी धमकीचा फोन आला होता. अज्ञात व्यक्तीने फोनवरून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मुंबईतील ‘अँटिलिया’ या निवासस्थानी आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली आहे. दरम्यान, एका अज्ञात इसमाने सोमवारी सकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील दूरध्वनीवर मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिल्याचे समजते. याप्रकरणी रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना या धमकीच्या फोनबाबत तात्काळ माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन धमकी आलेल्या क्रमांकाची तपासणी केली. तसेच, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून पोलिसांचे एक पथक अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानी रवाना झाले. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘अँटिलिया’ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

Check Also

एचडीएफसी म्युच्युअल फंडाबाबत मोठी घोषणा २६ एप्रिलपासून मॅन्युफॅक्चरींग फंड बाजारात

एचडीएफसी HDFC म्युच्युअल फंडाने २२ एप्रिल रोजी HDFC मॅन्युफॅक्चरिंग फंड लॉन्च करण्याची घोषणा केली. ओपन-एंडेड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *