Breaking News

१२ वीचा निकाल उद्या, पण पाहणार कोठे? ही आहेत संकेतस्थळे दुपारी एक वाजल्यापासून पाहता येणार ऑनलाईन निकाल

१२ वी परिक्षेचा निकाल कधी जाहिर होणार याबाबतची सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच उत्सुकता लागून राहिली होती. मात्र अखेर आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वी निकालाची तारीख जाहिर केली असून हा निकाल उद्या ८ जून २०२२ रोजी जाहिर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून हा निकाल विद्यार्थी आणि पालकांना संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) निकाल पाहण्यासाठी तीन संकेतस्थळे तयार केली आहेत. या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. उमेदवारांनी निकालासंबंधित सर्व नवीन माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट तपासत रहावे असेही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आवाहन केले आहे.

महाराष्ट्र एचएससी निकाल १० जून २०२२ रोजी वेबसाईटवर प्रसिद्ध होणार असे अपेक्षित होते. परंतु निकाल उद्या ८ जून रोजी जाहीर केले जाणार असल्याचे बोर्डाकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

या संकेतस्थऴावर निकाल पाहता येणार
msbshse.co.in
hscresult.mkcl.org
mahresult.nic.in.

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम MSBSHSE च्या अधिकृत वेबसाईट maharesult.nic.in किंवा hscresult.mkcl.org किंवा msbshse.co.in वर जा.

होमपेजवर, MSBSHSE १२वी निकाल २०२२ या लिंकवर क्लिक करा, निकाल जाहीर होताच लिंक सक्रिय होईल.

तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख एंटर करा, कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा.

तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल, तुम्ही खाली डाउनलोड करून सेव्ह करून डेस्कटॉपवर सेव्ह करू शकता.

महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे १४ लाख विद्यार्थी एचएससी परीक्षेला बसतात. गेल्या वर्षी कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्र बोर्डाने दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन आणि चाचणीच्या आधारे उत्तीर्ण करण्यात आले. मात्र यंदाही बोर्डाच्या परीक्षा दरवर्षीप्रमाणेच झाल्या, त्यामुळे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

१२ वीच्या परिक्षेसाठी यंदा १४ लाख ८५ हजार १९१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. यापैकी ८ लाख १७ हजार १८८ मुले तर ६ लाख ६८ हजार ००३ मुलींनी अर्ज भरला होता अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *