मुंबई : प्रतिनिधी
नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत असणारे प्रयोग अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांच्या खात्यात जमा होईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. यासाठी चाळीस लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यामार्फत नाट्य अनुदान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत नवीन नाटके, संगीत नाटके, प्रयोगात्मक नाटके यांना निर्मितीसाठी अनुदान दिले जात असते. मात्र काही नवीन नाटकांना सदरील अनुदान मिळाले नव्हते. यासंदर्भात संबंधितांना सूचना दिलेल्या असून लवकरच हे नाट्य अनुदान वितरित केले जाईल असे त्यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच नाट्य कलावंत व निर्माते यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी दिली.
Tags Amit deshmukh said marathi drama producer new Drama producer will get financial assistance from the next week new marathi drama
Check Also
कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक
कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …