बंगालच्या समुद्रातील मिचौंग चक्रीवादळ तामिळनाडू, आंध्रच्या किनाऱ्यावर धडकणार

नैसर्गिक वातावरणात सातत्याने बदल घडत आहे. या पार्श्वभूमीवर बंगालच्या उपसागरात काल सोमवारी निर्माण झालेल्या मिचौंग चक्रिवादळ दक्षिण भारताच्या समुद्री किनारी भागात ५ डिसेंबरला धडकणार असल्याचा इशारा यापूर्वीच भारतीय हवामान खात्याने दिला. या चक्रिवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाँडिचरी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू मध्ये आज दिवसभर मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक भागात पावसाचे पाणी साचून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडल्याचे पाह्यला मिळाले.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मिचौंग चक्रिवादळ सध्या समुद्राच्या मध्यभागी असून या चक्रिवादळाचा वेळ ताशी ९० किमी इतका आहे. या वेगाने ते दक्षिण भारतातील समुद्र किनाऱ्यांना येऊन थडकणार असल्याचा इशारा यापूर्वी हवामान विभागाने दिला आहे. या चक्रिवादळाच्या प्रभावाने कमी दाबाचा हवेचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाँडुचरी, आंध्र प्रदेश आणि तामीळनाडू भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे अनेक गावात पूर परिस्थिती आणि पावसाचे पाणी तुंबण्याचे प्रकार घडल्याचे दिसून येत होते.

त्यामुळे अनेक भागात रेल्वे वाहतूक सेवा आणि बस सेवा बंद कारावी लागली. तर अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले, तर अनेक ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली. मुसळधार पाऊसामुळे अनेक भागातील जुने मोठे वृक्ष उन्मळून पडले. तर शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहिर करण्यात आली. त्याचबरोबर अनेक भागात दरडी कोसळल्याच्या घटनाही घडल्याचे वृत्त पुढे येत आहे. मुसळधार पावसामुळे चेन्नई विमानतळावरून एकाही विमानाला उड्डाण घेणे शक्य होत नव्हते. त्यामुळे येथील विमानतळच बंद ठेवण्याची पाळी प्रशासनावर आली.

चक्रिवादळामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीत ६ नागरिकांचा बळी गेल्याची माहिती पुढे येत आहे. वास्तविक पाहता रविवारच्या मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. चेन्नई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सकाळी ३ वाजल्यापासून सुरु झालेला पाऊस काही केल्या थांबायला तयार नसल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तामिळनाडू आणि आंध प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपतकालीन परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची सूचना केली आहे.

About Editor

Check Also

सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी पथके तैनात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्राकडून मिळणाऱ्या पावसाच्या अनुमानानुसार राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *