Breaking News

Tag Archives: vijay wadettiwar

विजय वडेट्टीवारांनी आशा सेविकांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करताच अजित पवार म्हणाले…

आज सोमवारपासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात झाली. विधानसभा सभागृहात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी कामकाज सुरु होताच पुरवणी मागण्या मांडण्यास सुरुवात केली. परंतु त्याचवेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मध्येच मागील दिड महिन्यापासून राज्यातील आशा सेविकांकडून मानधनवाढीच्या मुद्यावरून सुरु असलेल्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर काहीशा चिडलेल्या अजित पवार …

Read More »

विजय वडेट्टीवार म्हणाले, सरकारच्या चहापानाला जाऊन त्यांच्या पापाचे वाटेकरी…

सरकारच्या आशिर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. मराठा समाजाची, शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. घोटाळेबाजांचे, कंत्राटदारांचे सरकारने हित जोपासले आहे. गंभीर पाणी प्रश्नाकडे सरकारने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण केले आहे. सरकारच्या या नाकर्तेपणामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचे सूचक वक्तव्य, एखादा आंदोलक असे आरोप करत असेल तर…

अंतरावली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे आंदोलन सुरु केले. परंतु मागील दोन-तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी अजय बावसकर यांनी जरांगे पाटील यांच्यापासून वेगळं होत मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यपध्दतीवरच आरोप करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, … सरकार निवडणुकांची वाट पाहतेय का?

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी पूर्वीच्या घोषणेप्रमाणे ३१ मार्चपर्यंत कायम ठेवली आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. त्यात कोणताही बदल केंद्र सरकारने केला नाही. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असून केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मतं मिळविण्यासाठी आरक्षण फसव्या सरकारकडून मराठा समाजाची पुन्हा फसवणूक

महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण न्यायालयात टिकणारे नाही. त्यामुळे फसव्या सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली असल्याची प्रतिक्रीया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. सरकारचे पितळ उघडे पडेल म्हणून आज सभागृहात विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलू …

Read More »

मोठी बातमीः मराठा आरक्षणाचे विधेयक आधी आवाजी तर नंतर एकमताने मंजूर

मागील काही वर्षापासून चिघळलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज पुन्हा नवे विधेयक सादर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेले मराठा समाजाला शैक्षणिक आणि शासकिय-निमशासकिय नोकरीत आरक्षण देणारे विधेयक अखेर आधी सत्ताधारी बाकावरील आमदारांच्या आवाजी मतदानाने तर नंतर विरोधकांनी पाठींबा असल्याचे जाहिर केल्यानंतर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, लोकप्रतिनिधीचा बुरखा पांघरून दहशत….

चिपळूणमध्ये सरकारच्या आशीर्वादाने बाहेरील गुंड मागवून राडा करण्यात आला. राडा संस्कृतीला सरकारकडून खतपाणी घातले जात आहे. त्यामुळे राज्यातली कायदा सुव्यस्था धाब्यावर आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधीला सत्तेचा माज असल्याने हा राडा केला असून हा सत्तेचा माज जनताच उतरवेल. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला सत्ताधारी लोकप्रनिधींकडून वारंवार गालबोट लावले जात आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी वारंवार …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, … डान्सबारना पोलीसांचेच संरक्षण

मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्याआड सर्रास डान्स बार चालवले जात आहेत. नियम धाब्यावर बसवून पहाटे पाचपर्यंत डान्सबार सुरू आहेत. मुंबईतील या डान्सबारना पोलीसांचेच संरक्षण आहे. या डान्सबारवर छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार म्हणाले की, बारचालकांनी सिंडिकेट तयार केले असून, सिंडिकेटमधील बार चालक …

Read More »

काँग्रेसची टीका, अशोक चव्हाण डरपोक, मैदान सोडून पळाले!

अशोक चव्हाण यांना दोनवेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार अशी विविध पदे काँग्रेस पक्षाने दिली. पक्षात नेतृत्व करण्याची संधी दिली. कालपर्यंत ते काँग्रेस पक्षात होते पण अचानक ते भारतीय जनता पक्षात गेले. अशोक चव्हाण डरपोक आहेत, ते मैदान सोडून पळाले आणि विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, असा घणाघात प्रदेश …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मराठा आरक्षण अधिसूचना

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. ही अधिसूचना काढण्याबाबतचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत झाला नाही. मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत्या २० फेब्रुवारीला संभाजीनगर येथे ओबीसींच्या विराट सभेचे …

Read More »