Breaking News

Tag Archives: vijay wadettiwar

निवडणूक सर्व्हे म्हणजे निकाल प्रभावित करण्याचा प्रकार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत महायुती २२९ जागा जिंकेल हा भारतीय जनता पक्षाचा दावा फाजील आत्मविश्वास दर्शवत आहे. असे सर्व्हे मॅनेज करण्यात भाजपचा हातखंडा असून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. तसेच असे सर्व्हे करून निवडणूकीचे निकाल प्रभावित करण्याचा प्रकार असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. निवडणुका …

Read More »

चेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरणाची सीआयडी चौकशी करा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी मुंबईत चेंबूरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर उपचार घेत असताना १९ वर्षांच्या मुलीचा बुधवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बलात्काराचा गुन्हा महिनाभरापूर्वी दाखल होऊनही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. हा सर्व प्रकार संताप आणणारा असून स्थानिक पोलिसांची भूमिका पाहता या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय …

Read More »

राज्यातील बेरोजगारीने गाठली परिसीमा; ३२ हजार जागांसाठी ३२ लाख अर्ज सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळेच उद्योग क्षेत्र संकटात असल्याचा वडेट्टीवार यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी आर्थिक मंदीची झळ महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रालाही बसलेली असून औरंगाबाद, नाशिक, पिंपरी चिंचवडमधील मोठ्या कंपन्यांनी उत्पादन कमी केल्यामुळे लाखो कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. भाजप सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळेच हे संकट ओढवले असून सरकारने लक्ष घालून या मंदीची झळ कामगारांना बसणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विधानसभेतील विरोधी …

Read More »

जनता अजूनही पूराच्या संकटात, भाजपला मात्र प्रचार यात्रेचे वेध केंद्राची प्रतिक्षा न करता राज्य सरकारने मदतीबरोबरच पशुधन देण्याची विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्यात पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे. केंद्र सरकारमध्ये राज्यातील आठ मंत्री आहेत. परंतु त्यांनी या संकटावेळी महाराष्ट्रासाठी भरीव आर्थिक मदत आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असतानाही त्यांच्याकडून प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. महापुरातून जनता अजून सावरलेली नसताना मुख्यमंत्र्यांना मात्र पुन्हा एकदा आपल्या प्रचार …

Read More »

शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीसह हेक्टरी ६० हजार मदत द्या मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या अनेक भागात पुरामुळे प्रचंड जीवित व वित्तहानी झाली आहे. शेतकरी, व्यापारी अन् नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने पूरग्रस्तांना भरीव आर्थिक मदतीसह शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि हेक्टरी ६० हजार रूपयांची मदत करावी अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्य सरकारकडे केली. …

Read More »

पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांना १० लाखाची मदत द्या तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची वडेट्टीवार यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी मराठवाडा व विदर्भातील काही भाग वगळता राज्याच्या इतर भागात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. या महापुरामुळे शेतमालासह खाजगी संपत्तीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन विनाविलंब नुकसान भरपाई द्यावी तसेच पूरग्रस्त …

Read More »

आदिवासी विभागातील साहित्य खरेदीत करोडो रुपयांचा घोटाळा उच्चस्तरीय चौकशी करून घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची वडेट्टीवारांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठीच्या साहित्य खरेदीत घोटाळा करुन राज्याची जवळपास ६० ते ७० कोटी रुपयांची लूट केली आहे, असा आरोप करुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. राज्यातील ५०२ आश्रमशाळामधील २ लाख विद्यार्थी तसेच वसतीगृहातील ५८ …

Read More »

आरक्षण कपातीचा निर्णय रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू भाजप-शिवसेना सरकारने ओबीसींच्या हक्कांवर गदा आणल्याचा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी इतर मागासवर्गीयांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये असलेल्या सध्याच्या २७ टक्के आरक्षणात बदल करून त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा ओबीसींच्या हक्कांवर गदा आणणारा आहे. हा आरक्षण कपातीचा निर्णय रद्द करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतींमध्ये …

Read More »

महाजनादेश यात्रा काढणाऱ्यांनो आधी पाच वर्षाचा हिशोब द्या जनतेला फसविल्याचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका …

Read More »

गहूंजे बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या फाशीला विलंब कोणामुळे ? दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईची विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी पुण्यातील गहूंजे येथील बलात्कार व हत्या प्रकरणातील दोन दोषींना सुनावलेल्या फाशीची अंमलबजावणी करण्यात अक्षम्य दिरंगाई केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाला फाशी रद्द करुन जन्मठेप द्यावी लागणे, हे राज्य सरकारचे मोठे अपयश आहे. फाशीच्या अंमलबजावणीस दोन वर्ष घालवणारे प्रशासन झोपा काढत होते का? असा संतप्त सवाल करत सरकारने तात्काळ चौकशी …

Read More »