Breaking News

Tag Archives: shivsena

उध्दव ठाकरे यांच्या भेटीला पंकज भुजबळ राजकिय उत्सुकता वाढीला

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या समर्थकांसह, स्वपक्षातील नेत्यांकडून केईएम हॉस्पीटलमध्ये रिघ लावली. मात्र छगन भुजबळ यांचे चिंरजीव आमदार पंकज भुजबळ यांनी मातोश्रीवर जात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची बुधवारी दुपारी भेट घेतली. तब्बल दोन वर्षानंतर छगन भुजबळ यांना जामीन …

Read More »

पंकजा मुंडे यांच्याकडून रमेश कराड यांना महामंडळाच्या अध्यक्षपदाचे गाजर विधान परिषद निवडणूकीच्या रिंगणातून राष्ट्रवादीच्या कराडांची माघार

बीड-मुंबई : प्रतिनिधी लातूर विधान परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश कराड यांच्या माईर या संस्थेच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यासंदर्भात दबाव आणत महामंडळाचे अध्यक्षपदाचे आश्वासन महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी रमेश कराड यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावल्याची चर्चा सध्या बीड जिल्ह्यात सुरु झाली आहे. मात्र या …

Read More »

शिवसेनेचे नाणार विषयीचे पत्र मुख्यमंत्र्यांकडून थंड बसत्यात नाणारसाठी जमिन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्याबाबत अद्याप प्रक्रियाच नाही

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नाणार प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या विरोधात भूमिका जाहीरपणे घेत हा प्रकल्प गेल्याची घोषणा केली. तसेच राज्य सरकारमधील शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा करत त्याविषयीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. मात्र …

Read More »

उध्दव ठाकरेच्यां आश्वासनामुळे शेतकऱ्याने आत्महत्येचा विचार बदलला उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी मारूती कुदळेंनी केले स्वत:ला परावृत्त

मुंबई : प्रतिनिधी देशात आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही म्हणून काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पत्र लिहीत आत्महत्या केल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आल्या. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर आत्मदहनाच्या विचारापासून शेतकरी पारावृत्त झाल्याची चांगली घटना नुकतीच उघडकीस आली. मागील ८ ते …

Read More »

राज्य सरकारमुळे नाणारचा तमाशा झालाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नाणार येथील रिफायनरीच्या प्रकल्पावरून सध्या सुरु असलेला गोंधळ हा आतून किर्तन बाहेरून तमाशा झाला असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी करत या गोंधळाला सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. राज्याचे उद्योग मंत्री असलेले सुभाष देसाईं हे जाहीर सभेत सांगतात कि अधिसूचना …

Read More »

नाणार प्रकल्पाच्या अधिसूचनेबाबत मुख्यमंत्री खरे की शिवसेनेचे उद्योगमंत्री ? रद्द करण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे उद्योग मंत्र्यांचे वक्तव्य तर मुख्यमंत्री म्हणतात निर्णय घेवू

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नाणार प्रकल्पासाठी भू-संपादनाची प्रक्रिया थांबविण्यासाठी याबाबतची अधिसूचना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी करत त्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे जाहीर केले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदरची अधिसूचना रद्द करण्याबाबतचे पत्र शिवसेनेच्या उद्योग मंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी दिल्याचे सांगत याबाबत योग्य निर्णय घेणार असल्याचे जाहीर …

Read More »

नाणार प्रकल्पावरून मुख्यमंत्र्यांना शिवसेनेच्या मंत्र्यांचे आव्हान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नाणार प्रकल्पावरून काल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केलेली टीका, त्यानंतर यासंदर्भातील जमिन भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्योग मंत्र्यांना अधिकार नसल्याचे जाहीर करणे या सर्व घडामोडींचे प्रतिसाद आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत …

Read More »

शिवसेनेचा नाणारला विरोध म्हणजे डील मोदी ‘व्हीलन’ शिवसेना कोण? ‘साइड व्हीलन’! विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी उद्धव ठाकरे मोदींना व्हीलन म्हणतात. मग मागील साडेतीन वर्ष केंद्रात आणि राज्यात त्यांचा जो डर्टी पिक्चर सुरू आहे, त्यात शिवसेनेची भूमिका काय आहे? मोदी व्हीलन असतील तर उद्धव ठाकरेंना साइड व्हीलनच म्हणावे लागेल, असा घणाघाती टीका करत नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध म्हणजे भाजपबरोबरील डील असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण …

Read More »

नाणारची अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार उद्योगमंत्री देसाईंना नाहीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून शिवसेनेच्या घोषणेतील घेतली हवा काढून

मुंबई : प्रतिनिधी नाणार येथील रिफायनरी प्रकल्पावरून स्थानिक रहिवाशी आंदोलनाच्या पावित्र्यात उभे राहीले आहेत. बहिष्काराच्या भीतीपोटी राज्याचे उद्योग मंत्री तथा शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी जमिन संपादनाची ती अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय जाहीर सभेत केला. मात्र त्यात्र त्यास काही तासांचा अ‌वधी उलटत नाही तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती अधिसूचना …

Read More »

नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द हा शिवसेनेचा पब्लिसिटी स्टंट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा शिवसेनेचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. शिवसेनेने आज नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत जाहीर केलेल्या भूमिकेवर नवाब मलिक यांनी सडकून टिका केली. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर सभेत आज नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची …

Read More »