Breaking News

Tag Archives: sangali

मंत्री जयंत पाटील ऑन ग्राऊंड झिरो… इस्लामपूरच्या 'त्या' परिसराचा घेतला आढावा

सांगली: प्रतिनिधी आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांच्या व्यवस्थेत कोणत्याही त्रुटी राहू नये हाच आमचा प्रयत्न आहे असे सांगत सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना बाधित इस्लामपूर शहरातील गांधी चौक परिसरात ग्राउंड झिरोवर जाऊन पाहणी केली. इस्लामपूरात एकत्रच कोरोनाचे २५ रुग्ण आढळल्याने सांगलीचे पालकत्व स्वीकारलेल्या जयंत पाटील यांनी न डगमगता खंबीरपणे परिस्थिती हाताळण्यास …

Read More »

१ लाख पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शिवसेना देणार दप्तरे कोल्हापूरात ४९ हजार तर सांगलीत २८ हजार विद्यार्थ्यांना दप्तरे देणार

मुंबईः प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील काही भागात आलेल्या पुरांमुळे अनेक नागरीकांच्या घरांतील सामानाबरोबरच विद्यार्थ्यांचे शालेय साहित्यही वाहून गेले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी अडचण येत आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील पूरग्रस्त १ लाख विद्यार्थ्यांना दप्तरे देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त ४९ हजार …

Read More »

शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफीसह हेक्टरी ६० हजार मदत द्या मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या अनेक भागात पुरामुळे प्रचंड जीवित व वित्तहानी झाली आहे. शेतकरी, व्यापारी अन् नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने पूरग्रस्तांना भरीव आर्थिक मदतीसह शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि हेक्टरी ६० हजार रूपयांची मदत करावी अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्य सरकारकडे केली. …

Read More »

पूरग्रस्‍तांच्या मदत व पुर्नवसनासाठी केंद्राकडे ६ हजार ८१३ कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील पूरग्रस्‍तांच्या मदतीसाठी व पुर्नवसनासाठी केंद्र सरकारकडे ६ हजार ८१३ कोटींची मदत मागण्यात आली असून केंद्राची मदत येईपर्यंत ही रक्‍कम तातडीने खर्च करण्यास राज्‍य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. पूरग्रस्‍त भागातील पडझड झालेली तसेच पूर्ण नष्‍ट झालेली घरे सरकार बांधून देणार आहे. तर २०८८ कोटींची नुकसान भरपाई पिकांसाठी देण्यात येणार …

Read More »

मुख्यमंत्री महोदय…महाराष्ट्रातील जनतेची मरणं तरी गांभीर्याने घ्या केवळ १० किलो धान्याचा आदेश हि पुरग्रस्तांची थट्टा असल्याचा नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप

मुंबई : प्रतिनिधी माझ्या वक्तव्यांना तुम्ही गांभीर्याने घेत नसाल तरीही त्याचे स्वागत करतो. मात्र तुमच्यापुढे सनदशीर मार्गाने मांडलेली राज्याची वास्तविक पुरपरिस्थिती तरी गांभीर्याने घ्या, ते ही जमत नसेल तर पुरात वाहून जाणाऱ्या जिवांना तरी तुमच्या गांभीर्याने घेण्याचा निकष लागु होतो का ?ते सांगा. किमान ज्या राज्याने तुम्हाला मुख्यमंत्रीपदावर बसविले त्या …

Read More »

कोल्हापूर, सांगली, कराडमधील पूरग्रस्तांना केंद्र व राज्य शासनाकडून सर्व प्रकारची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्त नागरिकांना राज्य सरकारकडून सर्व प्रकारची मदत दिली जात असून या प्रयत्नांना केंद्र सरकारकडून तत्परतने मदत केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आश्वस्त केले आहे. केंद्र सरकार संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने …

Read More »