Breaking News

Tag Archives: raj thackeray

अखेर मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या सुरक्षेत राज्य सरकारने केली वाढ आता एक ठाणे अंमलदार आणि पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती वाढविली

काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना धमकी देणारे पत्र मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या कार्यालयात आले. त्यानंतर नांदगावकर यांनी यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेत राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली. त्यातच काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही राज ठाकरे यांना अयोध्येत …

Read More »

संजय राऊत म्हणाले, अशी पत्रे शिवसेना भवनात शेकड्याने येतात मात्र… त्या पत्रावरून मनसेवर साधला निशाणा

काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना धमकीचं पत्र आल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेवून राज ठाकरे यांना सुरक्षा पुरविण्याची मागणी केली. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणा की, अशी पत्रे शिवसेना भवनात आम्हाला रोज शेकड्याने येत असतात असा …

Read More »

राऊतांचा मनसेवर निशाणा साधत भाजपाला आव्हान पोलिसांच्या भीतीने भोंगे गायब झाले, महागाईवर बोला

मागील काही दिवसांपासून राज्यात मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसे, भाजपाने राज्यातील महाविकास आघाडीवर निशाणा साधत असतानाच आज शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी मनसेवर टीकेची झोड उठवित भाजपाला महागाईच्या मुद्यावरून बोलण्याचे आव्हान दिले. महाराष्ट्रात पोलिसांच्या भीतीने सर्व राजकीय भोंगे गायब झाले, असे सांगत त्यांनी हिंदू समाजातच फूट पाडण्याचा प्रयत्न केला. खरंतर …

Read More »

अजित पवारांचा टोला, काही नेते घोषणा करतात आणि घरात जावून बसतात अन्… मनसेप्रमुख राज ठाकरेंवर साधला निशाणा

मागील महिन्यापासून मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत संघर्षाची भूमिका स्विकारली. मात्र त्यांच्या आक्रमक भूमिकेचा सर्वाधिक फटका हिंदू धर्मियांच्या मंदिरांना आणि कार्यक्रमांना बसला. तरीही मनसे कडून मस्जिदींवरील भोंग्यावरून अद्यापही आंदोलन मागे घ्यायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज ठाकरेंवर पुन्हा एकदा …

Read More »

राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार, न्यायालयाकडून दुसऱ्यांदा अजामीनपत्र वॉरंट २००८ मधील प्रकरणी परळीतील न्यायालयाने वॉरंट बजावले

भोंग्याच्या मुद्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादेत गुन्हा दाखल झाल्यानंतर राज ठाकरे यांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र राज ठाकरे यांना न्यायालयाने दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट बजावित न्यायालयाने हजर होण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे हे अजामीपात्र वॉरंट एका त्यांना २००८ मधील प्रकरणी आहे. त्यामुळे राज यांच्या …

Read More »

आघाडी सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला, पण भाजपा २७ टक्के आरक्षण देणार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसींची फसवणूक केली असून पाठीत खंजीर खुपसला आहे. तथापि, आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टी मात्र २७ टक्के तिकिटे ओबीसींना देऊन या समाजाला न्याय देईल, अशी ग्वाही …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, विषय फक्त मस्जिदींचा नाहीतर मंदिरांचाही आहे भोंग्यावरून पुन्हा राज ठाकरेंनी मांडली भूमिका

भोंग्यामुळे लोकांना जो दिवसभराचा त्रास होतो तो बंद होईल ही अपेक्षा आहे. हा विषय फक्त मशिदीवरील भोंग्यांचाच हा भाग नाही. मंदिरांवरचे ही आहेत अशी स्पष्टोक्ती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी करत मशिदींवरील भोंग्यांसाठी पोलिसांकडे इतके अर्ज आले इतक्याला परवानगी दिली, अशी माहिती दिली. आता मुंबईत, महाराष्ट्रात ज्या मशिदी आहेत त्या …

Read More »

संजय राऊत म्हणाले, आधी सुपारी देण्याचा शोध घेतला पाहिजे भाजपावर साधला निशाणा

एखाद्या राजकीय पक्षाला महाराष्ट्राची शांतता बिघडवायची असेल आणि त्यांना कोणी सुपारी दिली असेल तर सरकारने आधी सुपारी देणाऱ्यांचा शोध घेतला पाहिजे. हिंदू ओवेसींना सुपारी देऊन महाराष्ट्रातील शांतता बिघडण्यासाठी जे काही सुरु आहे त्यासाठी सरकार सक्षम आहे. मी काल मुख्यमंत्र्यांशी बराच वेळ चर्चा केली. सगळं शांत आहे. कोणी मनात आणलं म्हणून …

Read More »

गुन्हा दाखल झाल्यावर इम्तियाज जलील म्हणाले की, फारचं साधी कलमं लावली कदाचित मुख्यमंत्र्यांना त्यांचा भाऊ असल्याने तसे वाटलं असेल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमधील सभेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर देखील टीकास्तर सोडलं. विशेषत: राज ठाकरेंवर दाखल गुन्ह्यामध्ये जी कलमं लावण्यात आली आहेत, त्या कलमांविषयी …

Read More »

राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, बाळासाहेबांचे ऐकणार की, शरद पवारांचे ? पत्र लिहित हिंदू आपली ताकद काय ते राज्य सरकारला दाखवून देण्याचे आवाहन

औरंगाबादेतील सभेप्रकरणी पोलिसांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर मनसैनिकांना आपल्यापुढील ध्येय धोरणाची जाणीव होण्यासाठी राज ठाकरे यांनी थेट हिंदूधर्मियांना मस्जिदीसमोरील भोंग्याच्याविरोधात मोठ्या आवाजात हनुमान चालिसा वाजवावी असे आवाहन करत त्यातून आपली ताकद दाखवून द्या असे सांगत भोंग्याप्रश्नी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात पहिल्यांदा सांगितलेले असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …

Read More »