Breaking News

Tag Archives: ncp

अजित पवार यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा, न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने… कर्नाटकाला एक इंच देखील जागा देणार नाही

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल कर्नाटकात बोलत असताना महाराष्ट्राला एक इंचही जमिन देणार नसल्याची भूमिका जाहिरपणे मांडत महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका मांडली. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना इशारा दिला. अजित पवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची आपण वाट पहात …

Read More »

‘प्रती सभागृह’ उभे करत महाविकास आघाडीचा सरकारवर हल्लाबोल ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार निदर्शने...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, मराठी भाषिकांना महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत असे चित्र निर्माण करण्यासाठी दोन्ही सभागृहात ठराव एकमताने मंजूर करायला तयार आहोत. त्यामुळे तो ठराव घ्या अशी विनंती करण्यात आली होती, परंतु आज आठवडा संपतोय तरीही त्यांनी तो ठराव …

Read More »

जयंत पाटील यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे? राष्ट्रवादी काँग्रेसला दुखावणे महागात पडण्याची शक्यता

काल बुधवारी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना बोलण्याची संधी नाकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुम्ही तरी निर्लज्जपणा करू नका अशी नार्वेकरांना उद्देशून शेरेबाजी केली. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारकडून जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई शिंदे-फडणवीस सरकारने केली. मात्र आता या घटनेचे भलतेच पडसाद उमटू लागल्याने जयंत पाटील …

Read More »

निलंबनाच्या कारवाईनंतर जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया, .. तरी मी लढत राहणार राज्य सरकारच्या या हुकुमशाही कृतीचा जयंत पाटील यांनी केला निषेध...

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना सातत्याने बोलण्याची संधी मागूनही परवानगी नाकारली. त्यामुळे संतापाच्या भरात किमान तुम्ही तरी निर्लज्जपणा करू नका अशी तंबी दिली. त्यामुळे या वक्तव्याबद्दल सत्ताधारी पक्षाने जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशनाच्या कालावधी पर्यंत निलंबनाचा बडगा उगारला. त्यानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. …

Read More »

सरकारचे लक्ष नेमकं कुठे आहे…अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर आमदार निवासस्थानात गैरसोय-मुख्यमंत्री शिंदेचे आश्वासन

आमदार निवासस्थानात गैरसोयीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना टॉयलेटच्या शेजारी कपबशा धुवत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असल्याचे सांगितले. हे काय चाललंय आहे असा संतप्त सवाल करतानाच संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करा आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी केली. दरम्यान पोलीसांनाही जेवण दिले गेले नाही सरकारचे …

Read More »

विरोधकांना बोलण्याची संधी नाकारल्याने जयंत पाटील म्हणाले, तुम्ही तरी निर्लज्जपणा करू नका… अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील निलंबित

आज विधानसभेत फोन टॅपिंगच्या मुद्यावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर त्यास प्रत्युत्तर म्हणून सत्ताधाऱ्यांकडून दिशा सालियन आत्महत्या प्रकरण पुढे आणण्यात आले. त्यानंतर कामकाज सुरळीत झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भास्कर जाधव यांना बोलू देण्याची मागणी केली. मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांना बोलू देण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे विरोधक आपल्याच …

Read More »

दिशा सालियनप्रकरणी फडणवीसांच्या घोषणेनंतर अजित पवार म्हणाले, तीच्या आईवडीलांची तरी… सीबीआयला त्यात काही आढळून आले नाही

विरोधकांच्या फोन टॅपिंगच्या मुद्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गट आणि भाजपाने पध्दतशीरपणे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी दिशा सालियन आत्महत्या प्रकरण बाहेर काढले. तसेच सत्ताधारी आमदारांच्या मागणीनुसार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करण्याची घोषणाही विधानसभेत केली. मात्र फडणवीसांच्या या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सालियनच्या आई-वडीलांनी केलेल्या आवाहनाची …

Read More »

अजित पवार म्हणाले,.. ती अध्यक्षांची जबाबदारी, तर अध्यक्ष म्हणतात विशेषाधिकार समितीत जा अध्यक्ष राज्य सरकारला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत विरोधकांचा सभात्याग

विधानसभा सदस्यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी राज्य सरकारने सादर केलेल्या क्लोज रिपोर्टवर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे या प्रश्नी नियम ५७ अन्वये चर्चेची मागणी विधानसभेत विरोधकांकडून करण्यात आली. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, विधानसभा सदस्यांच्या हिताचे रक्षण करणे ही विधानसभा …

Read More »

छगन भुजबळ यांच्या फोटो मॉर्फिंगप्रकरणी भाजपाच्या भातखळकरांवर कारवाई करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विधानसभेत मागणी

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित करून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. याकडे माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज सभागृहाचे लक्ष वेधत आमदार अतुल भातखळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर …

Read More »

कोंबडी शब्दावरून भाजपाचा विधानसभेत गदारोळः भुजबळांनी शब्द मागे घेतला अजित पवारांनीही व्यक्ती केली दिलगिरी

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज दुपारी मुंबईप्रश्नी विधानसभेत चर्चा सुरु झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी कोंबडी असा शब्द प्रयोग करताच भाजपाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करावे लागले. दुपारच्या सत्रात मुंबईवरील चर्चेच्या वेळी छगन भुजबळ हे बोलायला …

Read More »